मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

आभाळाएवढ्या मोठ्या मनाचा माणूस; निवृत्त अधिकाऱ्याने शेजारच्या दिव्यांग मुलीस दिली लाखाची गाडी भेट

आभाळाएवढ्या मोठ्या मनाचा माणूस; निवृत्त अधिकाऱ्याने शेजारच्या दिव्यांग मुलीस दिली लाखाची गाडी भेट

(फोटो-लोकमत)

(फोटो-लोकमत)

कोल्हापुरातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याने (retired bank officer) शेजारी राहणाऱ्या एका दिव्यांग मुलीस लाखभर रुपयांची नवीकोरी दुचाकी भेट (gift new bike to handicapped woman) दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर: अपार्टमेंट संस्कृतीच्या जमान्यात आपल्या शेजारी कोण राहतं, याचीही खबर न ठेवणाऱ्या जगात कोल्हापुरातील एका निवृत्त अधिकाऱ्याने माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. संबंधित निवृत्त बँक अधिकाऱ्याने (retired bank officer) शेजारी राहणाऱ्या एका दिव्यांग मुलीस लाखभर रुपयांची नवीकोरी दुचाकी भेट (gift new bike to handicapped woman) दिली आहे. संबंधित मुलीला दररोज नोकरीला जाताना होणारा त्रास न बघवल्याने त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवत तिला लाख रुपये खर्च करून नवी कोरी दुचाकी घेऊन दिली आहे. त्यांच्या या मोठेपणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

संबंधित निवृत्त अधिकाऱ्याचं नाव विनायक कुलकर्णी असून ते बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले आहेत. ते कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरात वास्तव्याला आहेत. याच परिसरातील व्यंकटेश कॉलनीत संगीता जरंडे नावाच्या दिव्यांग महिला राहतात. दिव्यांग असल्याने दररोज नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामध्ये संगीता यांचा बराच वेळ खर्च होते. त्यामुळे त्यांना दुचाकी हवी होती. पण एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न संगीता यांना पडला होता.

हेही वाचा-रस्ता खचला अन् नशिबी आला एकांतवास; अडीच महिन्यांनतर पन्हाळ्यात अडकलेली ST डेपोत

दरम्यान, संगीता जरंडे या दिव्यांग तरुणीस नोकरीला जाण्यासाठी दुचाकीची आवश्यकता असल्याची माहिती सेवा निलयम् संस्थेचे सदस्य विनायक कुलकर्णी यांना समजली. नोकरीतून निवृत्त झालं असूनही कुलकर्णी यांनी दसऱ्याच्या दिवशी लाखभर रुपये खर्च करून एक नवीकोरी दुचाकी खरेदी केली. तसेच त्या दुचाकीला बाजूला दोन ज्यादा चाकं देखील बसवून घेतली.

हेही वाचा-अभ्यास ठरलं अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं कारण; कोल्हापुरातील हृदय हेलावणारी घटना

मंगळवारी दोन ज्यादा चाकं लावून दुचाकी उपलब्ध झाल्यानंतर, कुलकर्णी यांनी संगीता जरंडे यांच्या घरासमोर जाऊन त्यांना ही गाडी भेट दिली आहे. तसेच त्यांच्या धडपडीला भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी विनायक कुलकर्णी यांच्यासह वृषाली कुलकर्णी, स्मिता दिवसे, चैतन्य अष्टेकर, ऐश्वर्या मुनींश्वर आदी उपस्थित होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अनेक लोकं बचतीचा पैसा जपून वापरतात, पण विनायक कुलकर्णी यांनी मोठं मन करत दिव्यांग मुलीला मोलाची मदत केली आहे. त्यामुळे कुलकर्णी याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

First published:

Tags: Kolhapur