मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /panchganga river pollution : सीएम उद्धव ठाकरेंच्या आदेशाला कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखवली केराची टोपली, पंचगंगा पुन्हा प्रदूषित

panchganga river pollution : सीएम उद्धव ठाकरेंच्या आदेशाला कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखवली केराची टोपली, पंचगंगा पुन्हा प्रदूषित

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रत (panchganga river pollution) रसायनयुक्त प्रदूषित पाणी (chemical pollution water) आल्याने माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे तडफडून नदीकडेला तरंगत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रत (panchganga river pollution) रसायनयुक्त प्रदूषित पाणी (chemical pollution water) आल्याने माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे तडफडून नदीकडेला तरंगत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रत (panchganga river pollution) रसायनयुक्त प्रदूषित पाणी (chemical pollution water) आल्याने माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे तडफडून नदीकडेला तरंगत आहेत.

कोल्हापूर, 15 मे : कोल्हापूर जिल्ह्याला पाणी देणाऱ्या पंचगंगेला आता शेवटच्या घटका मोजाव्या लागत आहेत. नदी प्रदुषनामुळे मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा मासे मृत्यूमुखी (fish death) पडण्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रत (panchganga river pollution) रसायनयुक्त प्रदूषित पाणी (chemical pollution water) आल्याने माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे तडफडून नदीकडेला तरंगत आहेत. तर काही मृत झाले आहेत.

मागच्या काही महिन्यांपुर्वी पंचगंगा नदी प्रदुषीत झाली होती. यावेळी कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर प्रदुषण मंडळाला पंचगंगा नदी शुद्ध करण्याचे आदेश दिल होते. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाला पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा : heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद

दरम्यान मृत मासे सहजरित्या हाती लागत असल्याने मासे घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. काही मासेमार ही या संधीचा फायदा घेऊन तडफडणारे व मृत मासे विक्रीसाठी नेत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभिर्यांनेरपूर्वक घेण्याची गरज आहे.

महापुरानंतर सतत या वर्षात 5 ते 6 वेळा पंचगंगा नदीला प्रदूषित पाणी आल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या शिरढोण पूल ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. तर दोन महिन्यापासून इचलकरंजीला जाणाऱ्या कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम नदीपात्रात सुरू आहे. यासाठी बांध घातला आहे. पाणी काही प्रमाणात तुंबून राहिले आहे. तर इचलकरंजी येथील काळ्या-ओढ्याचे रासायनिक पाणी नदी पात्रात थेट सोडले जात आहे. सध्या धरणातून पाणी सोडल्याने काळ्या-ओढ्याचे पाणी शिरढोण-पुलाजवळ येऊन तुंबले आहे.

हे ही वाचा : 'राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, हनुमानजी त्यांना वरुनच उचलून घेतील', भाजप खासदाराचा इशारा

या प्रदूषित पाण्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडू लागले आहेत.नदीपात्राच्या कडेला येऊन पाण्यात उड्या मारत आहेत.तर काही मासे मृत होऊन नदीकडेला लागले आहेत.पुलावरून ये-जा करणार्‍या नागरिकांनी सहजरित्या मासे हाताला लागत असल्याने  नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. तर ही संधी मासेमारी करणाऱ्यांनाही न सोडता पोत्याने मृत व तडफडणारी मासे विक्रीला नेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. 

शिरढोण पूल ते अब्दुललाट पाणवठयापर्यंतच्या पंचगंगेवर आधारित गावच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न प्रदूषित पाण्यामुळे निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Pollution, Water