जयपूर 01 नोव्हेंबर : राजस्थानच्या एका न्यायाधीशाविरोधात गंभीर आरोप दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीस जितेंग्र गोलियावर आरोप आहे, की त्यांनी 14 वर्षाच्या एका मुलाचं लैंगिक शोषण केलं (Sexual Harassment). पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर जज आणि इतर दोघांविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. मुलाच्या आईनं पोलिसात जज आणि इतर दोघांविरोधात तक्रार केली होती.
काळिमा! सख्ख्या पुतण्यासोबत महिलेचं विकृत कृत्य; दोरीने गळा आवळून केला शेवट
हे प्रकरण समोर येताच रविवारी संध्याकाळी उशिरा जोधपूर उच्च न्यायालयाने जज जितेंद्र गोलियाला (Jitendra Goliya) तात्काळ प्रभावाने निलंबित केलं (Judge Suspended). जितेंद्र यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुलाच्या आईने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे, की लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) आणि इतर दोघांशी संबंधित खटले हाताळणारे विशेष न्यायाधीश गेल्या एक महिन्यापासून तिच्या मुलाचा काही नशेचे पदार्थ देऊन लैंगिक छळ करत होते.
5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; 65 वर्षीय अटकेत
पीडित मुलाच्या आईनं आरोप केला, की न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोन आरोपींनी तिला याबद्दल बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. न्यायाधीशाचे स्टेनो अंशुल सोनी आणि न्यायाधीशाचा दुसरा कर्मचारी राहुल कटारा अशी अन्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
भरतपूर पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की एसीबीचे सर्कल ऑफिसर परमेश्वर लाल यादव यांच्यासह सोनी आणि कटारा यांनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, न्यायाधीशांनी या मुलाशी जिल्हा क्लब कंपनी बाग येथे मैत्री केली, जिथे तो टेनिस खेळायला जायचा. यानंतर त्याच्या शोषणाची प्रक्रिया सुरू झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual harrasment, Suspend