मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुखी संसार लागली नजर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही मृतदेहाजवळच घेतला गळफास

सुखी संसार लागली नजर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही मृतदेहाजवळच घेतला गळफास

अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही विरारमध्ये एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण

अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही विरारमध्ये एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण

'अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही विरारमध्ये एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण...'

विरार, 25 ऑगस्ट : पतीचा (husband death) अचानक मृत्यू झाला त्यामुळे धक्का बसलेल्या पत्नीने (wife suicide) सुद्धा पतीच्या प्रेमासाठी आपली जीवनयात्रा संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना विरारमध्ये (virar) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात (virar police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पुर्वेकडील (virar east) मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीत नरेंद्रसिग परमार ( वय 24) हा (Narendra singh Parmar) पत्नी संतोषकुवर परमार (वय 22) हिच्यासह राहत होता. मंगळवारी नरेंद्रसिंग यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले होतं. उपचारानंतर त्याला रात्री 11 वाजता घरी आणण्यात आले होते. मात्र पोटदुखी आणखी वाढली आणि त्यातचं त्याचा मृत्यू झाला. घरात एकटी असेलल्या त्याची पत्नी संतोषकुंवर उर्फ बबली हिला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे तिने पतीच्या शेजारीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ओणमनंतर केरळात कोरोनाचा उद्रेक! 24 तासात 31 हजार रुग्ण, Positivity rate ही वाढला

बुधवारी सकाळी संतोषकुवरचा भाऊ रात्रपाळीवरून घरी आल्यानंतर दार बंद दिसले. दुसर्‍या चावीने दार उघडले असता हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

याप्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नरेंद्रसिंग परमार हा मिरा रोड येथील किराणा मालाच्या दुकानात काम करत होता. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही विरारमध्ये एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण, अचानक नरेंद्रसिंग यांचं पोटाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे पतीने साथ सोडून गेल्यामुळे पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला, त्यातून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

होती मनी म्हणून वाचली नानी !

विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे,पोलीस उपनिरीक्षक पूनम जांभळे, विठ्ठल चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी आरोग्यकेंद्रात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: