म्हैसूर, 25 ऑगस्ट : निसर्गरम्य पर्यटनस्थळी (tourist spot) फिरायला गेलेल्या तरुणीनं गुंडांना पैसे (money) द्यायला नकार दिल्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना उघडकीला आली आहे. या तरूणीच्या बॉयफ्रेंडलादेखील (boyfriend) या नराधमांनी जबर मारहाण (beaten) केली. महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे.
पर्यटनस्थळी घडली घटना
कर्नाटकातील म्हेसूरजवळ असणाऱ्या चामुंडी हिल्स परिसरात एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. ते दोघं तिथल्या निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक काही नराधमांनी त्यांना घेरलं आणि पैशांची मागणी केली. मात्र या दोघांनीही त्यांना पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर भडकलेल्या या समूहानं बॉयफ्रेंडला मारहाण करायला सुरुवात केली. पैसे दिले नाहीत, तर बलात्कार करू अशी धमकी देत या टोळक्यानं तरुणीला पकडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या बॉयफ्रेंडनं त्या परिस्थितीतही तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळक्यासमोर त्याचं काहीच चालू शकलं नाही.
पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टोळक्यातील गुंडांचं वर्णनदेखील पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र या घटनेला 24 तास उलटूनही अद्याप आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. मंगळवारी ही घटना घडली असून पोलीस सध्या आरोपींना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत असल्याचं सांगितलं जात आहे.
महिलेवर उपचार सुरू
या घटनेत तरुणीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची तब्येत सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे वाचा - चारित्र्यावर संशय घेतलाच आहे तर आता लग्न करणार! जैन मुनींचा फैसला
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
पर्यटनस्थळांच्या सुऱक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. निसर्गरम्य ठिकाणी अनेकदा पर्यटक एकटे असतात. दूरदूरवर कुणी मदतीला येणारं नसतं. अशा ठिकाणी गुंडांचा बंदोबस्त कसा करायचा, हे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र अशा गुंडांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना तातडीनं शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.