छत्रपती घराण्यात माझा जन्म म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य

छत्रपती घराण्यात माझा जन्म म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य

Maratha reservation: राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 09 जुलै: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच आंदोलन राज्यात सुरू झालं. कोल्हापूर, (Kolhapur)नाशिक (Nashik) या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आलं. आता संभाजी राजे छत्रपती यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्याची माहिती राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना दिली. संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना तुम्ही शांतपणे आंदोलन का करताय असं विचारल्यावर माझा स्वभावच शांत आहे, ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा हे मला नक्की कळतं आणि छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, अशी समजच संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाबाबत राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्या सगळ्या चर्चेला खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी हे वक्तव्य करून पूर्णविराम दिला आहे.

सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजी राजे छत्रपती यांची आज सारथी संस्थेबाबत चर्चा झाली. या दरम्यान राज्य सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली आहे.

हेही वाचा- ''संजय राऊतजी, आम्हालाही आरेला कारे करता येते'', भाजपचा इशारा

आपल्या मागण्यांबाबत चालढकल केली जात आहे याबाबत ही संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे जर मुख्य केंद्र होत असेल तर आनंदच आहे. त्यामुळे राज्यातील इतर सारथी संस्थेच्या उपकेंद्रांना चालना मिळेल अस संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

आपल्या सहा मागण्या होत्या त्याबाबत काही हालचाली होत आहेत पण बाकीच्या मागण्यांबाबत अजून काही निर्णय झालेले नाहीत. येत्या 14 जुलैला बोर्ड मीटिंग होणार आहे. या बैठकीमध्ये जर सकारात्मक निर्णय झाले नाहीत. तर पुन्हा राज्यात मूक आंदोलन सुरू केले जाईल, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे.

हेही वाचा- मोठी बातमी, 9 तासांच्या चौकशीनंतरही एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मूक आंदोलन झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि त्यासोबतच संभाजीराजे यांच्या इतर मागण्यांबाबत राज्य सरकारने आता लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे, नाहीतर पुन्हा मराठा समाज आंदोलन करणार हे नाकारता येत नाही.

Published by: Pooja Vichare
First published: July 9, 2021, 2:13 PM IST

ताज्या बातम्या