मुंबई, 09 जुलै: भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp Leader Chitra Wagh) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांना इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत चित्रा वाघ यांनी राऊतांना एक प्रकारची ताकीदचं दिली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
ही पोस्ट शेअर करताना चित्रा वाघ यांनी संजयजी राऊत काल माननीय स्मृती इराणी यांच्याबद्दल जे बरळलात…मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन, असं कॅप्शन त्यांनी दिली आहे.
संजयजी राऊत काल मा. @smritiirani बद्दल जे बरळलात… मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… @rautsanjay61 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/zvGvofjChi
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 9, 2021
आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.
संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले. नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. ती उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच शिवसेनेला ते झेपलं नाही. असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूंना (सुनील राऊत) लवकरच मंत्रीपद मिळेल, जेणेकरून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा खोचक टोला देखील चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा- मोठी बातमी, 9 तासांच्या चौकशीनंतरही एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ
काय म्हणाले होते संजय राऊत
संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती इराणी यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत म्हणाले होते की, शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. ते पेट्रोलियम मंत्री होते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती इराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळत आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. ते बरोबर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chitra wagh, Sanjay raut, Shivsena