उटावा, 30 सप्टेंबर : कोणताही जीव ज्याचं शीर आणि धड वेगळं झालं तर तो जिवंत राहत नाही. कारण यामुळे शरीराच्या अनेक क्रिया बंद होतात आणि मृत्यू ओढावतो. असं असताना एका बेडकाने (Frog video) मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. या बेडकांचं शीर नाही आहे (Frog without head alive). पण तरी ते जिवंत आहे (Zombie frog). चक्क टुणटुण उड्याही मारतं आहे (Headless frog alive).
कॅनडातील उटावामध्ये बिनशिराचं बेडूक उडी मारताना दिसलं. या बेडकाचं डोकं धडावेगळं झालेलं असतानाही ते जिवंत होतं. श्वास घेत होतं. त्याच्या मानेजवळील नसा फडफडत होत्या आणि टुणटुण उड्याही मारत होतं.
एका व्यक्तीने या बेडकाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओत पाहू शकता एक बेडूक दिसतो आहे. त्याचं शीर नाही आहे. बेडुक एका ठिकाणी तसंच बसलेलं दिसतं. ते मृत झाले आहे असंच वाटतं. पण जेव्हा एक व्यक्ती त्या बेडकाला स्पर्श करते तेव्हा बेडूक उडी मारतं. त्यानंतर पुढे ते टुणटुण उड्या मारत जातं.
हे वाचा - VIDEO: खरोखरचं Man vs Wild! घराबाहेर आलेल्या मगरीला पकडण्याचा थरार कॅमेरात कैद
शरीरात आपला मेंदू खूप महत्त्वाचा भाग असतो आणि मेंदू असतो तो डोक्यात. पण या बेडकाचं ते डोकंच नाही आहे, तरीसुद्धा ते इतकं वेळ जिवंत आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्यच वाटतं आहे. या बेडकाला झॉम्बी बेडूक म्हटलं आहे. झॉम्बी आता आपल्यासाठी काही नवीन नाही. झॉम्बीच्या बऱ्याच फिल्म्स आपण पाहिल्या आहेत. ज्यात मृत झाल्यानंतरही माणसं जिवंत राहतात पण त्यांच्या व्यवहार बदलतो.
पण बायोलॉजी प्राध्यापकांच्या मते, हा कोणता झॉम्बी बेडूक नाही. तर शीर नसलं तरी बेडूक श्वास घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos