मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाऊ शकतो जीव

आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाऊ शकतो जीव

विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे.

विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे.

विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे.

मुंबई, 1 ऑक्टोबर : आपल्या पृथ्वीवर 71 टक्के भागात पाणी आणि 29 टक्के भागात जमीन आहे. उपलब्ध असलेलं बहुतांश पाणी महासागर आणि समुद्रात आहे. ज्या प्रकारे जमिनीवर अनेक परिसंस्था आहेत, त्याचप्रमाणे पाण्याखालीदेखील शेकडो परिसंस्था आहेत. या परिसंस्थांमध्ये अनेक विषारी प्रजाती अस्तित्वात आहेत. काही जीव तर असे आहेत, ज्यांच्या केवळ एका दंशानेसुद्धा आपला जीव जाऊ शकतो. विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे. ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लायनफिश दिसल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिसायला अतिशय आकर्षक असलेल्या लायनफिशचं वजन साधारण 1.5 किलोपर्यंत असतं, तर लांबी 5 ते 45 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. त्याच्या पेक्टोरल फिन्सला (Pectoral Fins) विषारी काटे असतात, ज्यांचा डंख खूप विषारी आणि वेदनादायक असतो. लायनफिशने डंख केला तर तर व्यक्तीला तीव्र वेदना सुरू होतात. याशिवाय धाप लागून उलट्यांचादेखील त्रास सुरू होतो. याहीपेक्षा भीतिदायक म्हणजे हा मासा चावल्यामुळे अर्धांगवायू (Paralysis) होण्याची शक्यता असते. कधीकधी व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. व्यक्तीला जीवे मारण्याची क्षमता असलेला हा लायनफिश काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या किनाऱ्यावर आढळला. किनारी भागात लायनफिश आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा मासा ज्या ठिकाणी आढळला तो भाग कायम पर्यटकांच्या गर्दीनं फुललेला असतो. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षांच्या अरफॉन समर्स नावाच्या व्यक्तीनं हा लायनफिश पकडला आहे. त्याची लांबी 6 इंच असून त्याच्या अंगावर 13 विषारी काटे आहेत. लायनफिश प्रामुख्यानं दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आणि हिंदी महासागरात (Indian Ocean) आढळतात; मात्र सध्या भेडसावत असलेल्या जागतिक तापमानवाढीच्या समस्येमुळे आता भूमध्य समुद्रातही (Mediterranean Sea) त्यांचं वास्तव्य दिसतं. अरफॉननं पकडलेला मासा इटलीहून ब्रिटनमध्ये पोहोचला असावा, अशी शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे मासे फक्त मानवासाठीच नाही, तर इतर सागरी जीवांसाठीदेखील हानिकारक आहेत. कारण, याचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं त्या भागातल्या इतर जीवांनादेखील ते हानी पोहचवतात. तुम्हाला समुद्रात डायव्हिंग करण्याची हौस असेल आणि त्यासाठी तुम्ही वारंवार पाण्यात जात असाल, तर या धोकादायक लायनफिशबद्दलची माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे.
First published:

पुढील बातम्या