मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /"मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री" उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

"मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री" उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

Uddhav Thackeray: कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांसाठी पॅकेज देण्याच्या संदर्भात भाष्य करताना विरोधकांना टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray: कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांसाठी पॅकेज देण्याच्या संदर्भात भाष्य करताना विरोधकांना टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray: कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांसाठी पॅकेज देण्याच्या संदर्भात भाष्य करताना विरोधकांना टोला लगावला आहे.

कोल्हापूर, 30 जुलै: पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याचा (Flood hit Kolhapur) पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर पत्रकार परिषद घेतली. आपण नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहोत, यावेळच अस्मानी संकट मोठं आहे. अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणे गरजेचे आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, आताच वेळ आहे असं म्हटलं आहे. तसेच पूरग्रस्तांच्या पॅकेज संदर्भात भाष्य करताना विरोधकांवर निशाणा सुद्धा साधला आहे.

मी मदत करणारा मुख्यमंत्री

पॅकेजची घोषणा करायला इतका उशीर का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाहीये तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री आहेत ते सुद्धा मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मी पॅकेज मुख्यमंत्री नाहीये. मी यापूर्वीच सांगितलं आहे की लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाहीये. तात्काळ मदतीची घोषणा केली आहे. संपूर्ण परिस्थिती आणि पंचनामा झाल्यावर मदत देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे इकडेच आहेत मला कळल्यावर मी त्यांना सांगितलं थांबा मी येतोय. याचं कारण मला नागरिकांच्या जीवाशी खेळायचं नाहीये, राजकारण करायचं नाहीये. त्यांच्याही काही सूचना असतील तर त्याचंही आम्ही स्वागत करु. आमच्यात तेथे बोलणं झालं ते खुलेआम झालं. मी त्यांना सांगितलं, कायमस्वरुपी आपल्याला काही मार्ग अवलंबावा लागले. तुम्हालाही मी बोलवेल मुंबईत संपूर्ण बाबतीत चर्चा करु. तीन पक्ष तर एकत्र आहेतच आणि चौथा पक्ष सुद्धा आला तर जोकाही आपण निर्णय घेऊ त्याआड कुणीही येणार नाही.

भिंत बांधण्याची कल्पना आहे असं म्हटलं होतं. भिंत बांधायची की नाही यावरुन मत-मतांतर होणार असतील तर आपण पुढे सरकू शकत नाहीत. भिंत बांधणे हा पर्याय असू शकतो का हे पहावं लागेल. जर असू शकतो तर तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे नसेल तर मुद्दा सोडून दिला पाहिजे. मला भिंत बांधायचीच आहे असं माझं म्हणणं नाहीये. पण अतिरिक्त पाणी आहे त्याचं काय करायचं त्यावर मार्ग काढायला लागेल. आपल्याला ठावूक आहे की, संकट ओढवू नये म्हणून जयंत पाटील यांनी कर्नाटकात जावून तेथील मंत्र्यांसोहत चर्चा केली होती म्हणून तरी निदान संकटाचं प्रमाण थोडं कमी झालं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Uddhav thackeray