कोल्हापूर, 30 एप्रिल : जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातून (Kolhapur corona news) एक सुन्न करणारी अशी घटना (Shocking incident) समोर आली आहे. दोन लहान चिमुरड्यांना लवकरच परत येतो सांगून कोरोना उपचारासाठी गेलेले आई-वडील परत आलेच (C****ouple died by Corona) नाही. हसत-खेळत असलेलं कुटुंब अचानक उध्वस्त झाल्याचं याठिकाणी पाहायला मिळालं आहे. (Children lost mother and father) शाहूवाडी तालुक्यातल्या शित्तूर तर्फ मलकापूरमधली ही घटना आहे. महादेव पाटील आणि सीमा पाटील हे दांपत्य आणि या दांपत्याला पूर्वा आणि तन्मय ही दोन चिमुकली मुलं. या चौघांचं कुटुंब पुण्यात हसत-खेळत होतं महादेव हे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते तर सीमा या देखील नोकरीला होत्या. हे दाम्पत्य कोरोनामुळं मुलांसह गावी आलेलं होतं. याठिकाणी आल्यानंतर त्यांना कोरोनानं गाठलं. काहीही गंभीर लक्षणं नसल्यानं हे दाम्पत्य उपचारासाठी गेलं. जाताना त्यांनी मुलांना आम्ही लवकरच येतो तुम्ही काळजी घ्या असं सांगितलं आणि दवाखान्यात उपचारासाठी गेले. कोल्हापुरात खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यान सीमा यांची प्रकृती अधिक खराब झाली. अखेर बुधवारी सीमा यांचा कोरोनानं मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर महादेव यांची तब्येतही खालावत गेली. त्यांना ऑक्सिजन सुरू होता. पण गुरुवारी त्यांची तब्येत अधिक खराब झाली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. मुले घरी आई वडिलांची वाट पाहत असताना एका दिवसाच्या फरकानं पती पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळं पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (हे वाचा- डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती करू लागला हालचाल ; वाचून अंगावर येईल काटा ) दुर्दैवाची बाब म्हणजे या दाम्पत्याची नऊ वर्षांची मुलगी पूर्वा आणि सहा वर्षांचा मुलगा तन्मय यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पूर्वा आणि तन्मय ही दोन्ही चिमुकली दररोज आई-वडिलांची फोन करून चौकशी करायचे आणि आरोग्याबाबत विचारायचे. पण आता हा प्रश्न कायमचा थांबला आहे. ते गावी असताना कोल्हापुरात त्यांच्या आई वडिलांचा अंत्यसंस्कार त्यांच्या काकांनी केला. कोरोनाच्या भीतीनं या मुलांना अंत्यदर्शानासाठीही आणलं नाही. कोरोनाची लागण झालेली असल्यानं आई वडिलांना जातानं मुलांना मायेनं जवळ घेता आलं नव्हतं. आणि आता आई-वडिलांचं अखेरचं दर्शनही मुलांना घेता आलं नाही. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते. (हे वाचा - औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून 2 गटात तुफान राडा; जबरी मारहाणीत महिलेचा गर्भपात ) महादेव यांना पुण्यात चांगली नोकरी होती. पुण्यात घर, गाडी सर्व काही सुखाचं सुरू होतं. पण कंपनी काही दिवसांसाठी बंद होती. पत्नीलाही सुटी असल्यानं कुटुंब गावी आलं होतं. पण याठिकाणी असं काही घडलं की हे कुटुंबच जणू उध्वस्त झालं. आता या दोन चिमुरड्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हा एकच प्रश्न संपूर्ण कुटुंबासमोर उभा राहिला आहे. दोघांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं घरातून निघताना महादेव पाटील आणि सीमा पाटील या दोघांनी आपल्या दोन्ही चिमुकल्यांचा निरोप घेतला होता बाळांनो आम्ही लवकरच परत येईन असंही सांगितलं होतं पण हे दोघं अखेर घरी परतलेच नाहीत. त्यामुळेच प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे, गरजेचे आहे तरच आपण कोरोनाला हरवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.