कोल्हापूर, 28 मे : महाराष्ट्र (Maharashtra) झोपेत असतानाच राज्य सरकार कोसळेल, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यासह भाजपचे (BJP) नेते कोमात आहे का? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushruf) यांनी विचारला आहे. महाविकास आघाडीचं सरकार दीड वर्षांपासून व्यवस्थित सुरू आहे. त्याला धोका नाही असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचंही ते म्हणाले.
(वाचा-मुंबई Unlockचा plan ready;1 जूनपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठ्या बदलाची तयारी)
दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका करत आहेत. पण सरकार तर पाच वर्षे चालणारच आहे आणि त्याचा बोनस त्यानंतर त्यापुढच्या पाच वर्षात मिळणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली सेव्ह मेरीट- सेव्ह नेशन संघटना भाजप आणि आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
(वाचा-फक्त एका डोसमध्येच कोरोनाचा खात्मा; जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लशीला मंजुरी)
संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांना मुंबईत भेटले आहेत. मराठा आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असं सांगतानाच मुश्रीफ यांनी आरक्षणाचे अधिकार केंद्राला आहेत. त्यामुळं केंद्राकडे जावे लागेल, असंही म्हटलं. तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले पाहिजेत, असंही ते म्हणाले.
एकाबाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा प्रयत्न करायचा. दुसऱ्या बाजूला टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे. तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून आंदोलनासाठी चिथवणी देऊन सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा तिहेरी डाव आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. पण मराठा समाजाला कोणत्याही स्थितीत आरक्षण मिळवून देणारच असं, मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Kolhapur, Maharashtra News, Maratha reservation