जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / फक्त एका डोसमध्येच करणार कोरोनाचा खात्मा; Johnson and johnson च्या single shot लशीला मंजुरी

फक्त एका डोसमध्येच करणार कोरोनाचा खात्मा; Johnson and johnson च्या single shot लशीला मंजुरी

फक्त एका डोसमध्येच करणार कोरोनाचा खात्मा; Johnson and johnson च्या single shot लशीला मंजुरी

जॉन्सन अँड जॉन्सनची (Johnson and johnson) सिंगल शॉट कोरोना लस (Single Shot Corona Vaccine) कोरोनाविरोधी लढ्यात मोठं शस्त्र ठरणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 28 मे : कोरोना लशीचे (Corona vaccine) सध्या दोन डोस घेणं अनिवार्य आहे. पण आता कोरोनाचे दोन डोस घेण्याची गरज नाही. एकच डोस पुरेसा ठरणार आहे. कोरोना लशीचा एकच डोस कोरोनाव्हायरसचा खात्मा करणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and johnson) सिंगल शॉट कोरोना लशीला (Single Shot Corona Vaccine) मंजुरी देण्यात आली आहे. यूके (UK) सरकारने शुक्रवारी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट कोरोना वॅक्सिनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यूकेमध्ये आता ही लस दिली जाणार आहे. अमेरिकेत या लशीचं ट्रायल झालं आहे. त्यावेळी ही लस सौम्य आणि गंभीर कोरोना संसर्ग रोखण्यात 72 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं. ब्रिटनने या लशीच्या 2 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितलं, या निर्णयामुळे यूकेतील यशस्वी लसीकरण मोहिमेला अधिक मजबुती मिळेल. आता आमच्याकडे चार सुरक्षित कोरोना लशी आहे. सरकारच्या मते, येत्या काही महिन्यांत सिंगल शॉट लशीमुळे लसीकरणात मोठा फरक दिसेल. हे वाचा -  कोरोनापासून वाचण्यासाठी भयंकर उपाय; त्याने चक्क खाल्ला कच्चा विषारी साप आणि… ब्रिटनमध्ये आतापर्यंत 6.2 कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. सर्वात जास्त लस  ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेका आणि फाइझर कंपनीची देण्यात आली आहे. याशिवाय मॉडर्नाच्या लशीला परवानगी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात