मुंबई, 28 मे : मुंबईत कोरोना व्हायरसची (Coronavirus) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबईत शुक्रवारी (24 तासात) 929 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1239 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जूननंतर मुंबईतील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता येणार आहे. CNN News18 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 1 जूनपासून अनलॉकची (Mumbai unlocked ) सुरुवात होणार आहे.
अत्यावश्यक व्यतिरिक्तच्या सेवा, त्याशिवाय मान्सूनसंदर्भातील सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये दुकानांना 7 ते 11 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जूनपासून सुरू होणाऱ्या अनलॉकमध्ये सर्व सेवा पूर्णवेळ सुरू नसतील. मात्र वेळेत शिथिलता करण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना समोर येतील. दुसरीकडे मात्र राज्यातील 18 रेड झोन जिल्ह्यांमध्ये 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. यामध्ये मुंबईला मात्र दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून रुग्णसंख्या कमी केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या या य़शात त्यांना 1 जूननंतर मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा-1 जूननंतरही अनलॉक नाही, कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी-शासकीय कार्यालयांबाबत काय ठरलं
मुंबईच्या रुग्णसंख्येत घट
मुंबईत शुक्रवारी (24 तासात) 929 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1239 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर गेल्या 24 तासात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 27,958 इतकी राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.