Gokul Dudh Sangh elections : गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना धक्का, विरोधकांनी उधळला सर्वात आधी विजयाचा गुलाल!

Gokul Dudh Sangh elections : गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना धक्का, विरोधकांनी उधळला सर्वात आधी विजयाचा गुलाल!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत देखील सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर

  • Share this:

कोल्हापूर, 04 मे : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे (Gokul Dudh Sangh elections) सत्ताधारी कोण असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  मतमोजणी सुरू असून निकालाचे कल आता हाती येत आहे. विरोधी गटाने विजयाचा गुलाल उधळला आहे. दोन उमेदवार विजयी झाले आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी 2 तारखेला मोठ्या चुरशीने गोकुळ दूध संघासाठी मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून  मतमोजणीला सुरुवात झाली. सत्ताधारी गटाकडून शाहू पॅनलखाली उमेदवार मैदानात  आहे. तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभं करण्यात आलं आहे. सुरुवातीपासून विरोधी गटाने आघाडीवर आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत देखील सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर आहे. विरोधी गटाने विजयाचं खातं उघडलं आहे. विरोधी गटातील सुजित मिनचेकर 346 मतांनी विजयी झाले आहे. तर अमर पाटील 436 मतांनी विजय मिळवला आहे. सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी गटातील आरक्षण असलेल्या गटातील तीन उमेदवार निवडून आले आहेत. माजी आमदार सुजित मिणचेकर अमर पाटील आणि बयाजी शेळके हे तीन उमेदवार निवडून आले आहेत.महिला गटातील मतमोजणी सध्या सुरू आहे तर सर्वसाधारण गटाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहेत.

स्मार्ट शहर नव्हे Smart Village, या गावात आता एकही कोरोना रुग्ण नाही!

या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार महादेवराव महाडिक, आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 3 मंत्री म्हणजेच हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह पाच आमदारांचीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे सत्ताधारी गड राखणार की सत्तांतर होणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला दूध संघ आणि याच दूध संघाच्या संचालकपदासाठी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत मोठी चढाओढ असते.  या दूध संघाच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणार्‍या दूध संस्थांच्या ठरावाला मोठे महत्त्व असतं. त्यामुळे विद्यमान मंत्री आणि आमदार मोठी ताकद वापरून हे ठराव गोळा करत आहेत. काही गटांमार्फत यापूर्वीच हे ठराव गोळा करण्यात आले आहेत.

'भाजपनं मतदारांना 3 दिवस डांबून ठेवलं, पंढरपुरात पुन्हा निवडणूका घ्या!'

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जल्लोष करण्यावर आणि मिरवणूक काढण्यावर बंदी घातली असून कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 12:31 PM IST

ताज्या बातम्या