पंढरपूर, 04 मे: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awtade) 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विजयी आणि पराजित दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंढरपुरात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणी केली आहे. या पत्रात राष्ट्रवादीनं भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषदतेचे विद्यमान आमदार असणऱ्या आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी त्यांच्या कारखान्यात काम करण्याऱ्या कामगारांना निवडणुकीच्या आधी तीन दिवस डांबून ठेवल्याचागौप्यस्फोट या पत्रात करण्यात आला आहे. शिवाय भाजपला मतदान करा अन्यथा कामावरुन काढून टाकू अशी धमकी दिल्याचंही संबंधित पत्रात नमूद केलं आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे अॅड. नितीन माने यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. पंढरपूर पोट निवडणुकीत भाजपनं साम दाम दंड पद्धतीचा वापर केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात विविध मागण्या केल्या आहेत. विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोघांच्या कारखान्याचे तसंच कार्यालयाचं आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं. त्याचबरोबर दोघांचं फोन रेकॉर्डिंग तपासावं आणि समाधान आवताडे यांच्या कंट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करावा अशा विविध मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहे.
हे वाचा-'भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकलीय'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपनं अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत 'तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो' असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Pandharour, Solapur