मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

Gokul Election Result: अखेर 25 वर्षांनंतर सत्तांतर; महाडिकांनी गोकूळ गमावलं, पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

Gokul Election Result: अखेर 25 वर्षांनंतर सत्तांतर; महाडिकांनी गोकूळ गमावलं, पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाला मोठा फटका बसला आहे.

कोल्हापूर, 2 मे: सर्वांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (Kolhapur District Milk Producers Association) अर्थात गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल (Gokul dairy association election result) जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने वर्चस्व मिळवलं आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच पाटील-मुश्रीफ गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

गोकूळ दूध संघात अखेर सत्तांतर झाले आहे. सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता विरोधकांनी उलधवली आहे. 17-4 अशा फरकाने विरोधी गटाने गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. विरोधी आघाडीतील 17 उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाच्या अवघ्या चार उमेदवारांना विजय मिळवता आला आहे.

वाचा: Gokul Dudh Sangh elections : गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना धक्का, विरोधकांनी उधळला सर्वात आधी विजयाचा गुलाल!

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी 2 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सभासदांनी मोठ्या उत्साहात मतदानात सहभागी होत मतदान केलं होतं. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सत्ताधारी महाडिक गटाकडून शाहू पॅनलखाली उमेदवार रिंगणात होते तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभे करण्यात आले होते.

मतमोजणीला सुरुवात होताच विरोधी गटातील सुजित मिनचेकर हे 346 मतांनी विजयी झाले तर अमर पाटील यांनी 436 मतांनी विजय मिळवला. हा सत्ताधारी गटासाठी मोठा धक्का होता. त्यासोबतच विरोधी गटाचे इतरही उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.

First published:

Tags: Election, Kolhapur