बोअरवेलचं बटण दाबलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

बोअरवेलचं बटण दाबलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

Kolhapur News: कोल्हापूर येथील रंकाळा बस स्टॅंड परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विजेचा धक्का (electric shock) लागून मृत्यू (Death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 ऑगस्ट: कोल्हापूर येथील रंकाळा बस स्टॅंड (Rankala Bus Stand) परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विजेचा धक्का (electric shock) लागून मृत्यू (Minor girl death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बांधकामाला पाणी मारण्यासाठी बोअरवेलचं बटण सुरू करताना विजेचा धक्का लागल्यानं हा अपघात घडला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्ता रोको केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अंकिता अनिल शेळके असं दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या 15 वर्षीय मुलीचं नाव आहे. संबंधित मुलगी रविवारी सकाळी दहाच्या सुमारास रंकाळा बस स्टॅंड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्यासाठी गेली होती. दरम्यान पाणी सुरू करण्यासाठी तिने बोअरवेलचं बटण दाबताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यातचं 15 वर्षीय अकिंताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलीचे मामा महादेव ब्रम्हदेव सोनवणे यांनी जुना राजवाडा पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा-दारुड्या पतीला जेवू घातले, औषध पाजले आणि दिला वीजेचा शॉक, पत्नीविरुद्ध गुन्हा

मृत मुलीच्या मामानं तक्रार दाखल केल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर येताच परिसरात अनेक लोकांनी गर्दी केली होती. मुलीच्या अपघाती निधनानं आईनं तर हंबरडा फोडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा-नांदायला नकार देणाऱ्या मुलीसोबत बापाचं अमानुष कृत्य; 4दिवसांनी नदीत आढळला मृतदेह

ही घटना समोर आल्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केलं आहे. या आंदोलनात आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह अनेक कामगार उपस्थित होते.

Published by: News18 Desk
First published: August 17, 2021, 12:23 PM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या