कुरुंदवाड, 17 ऑगस्ट: चिकोडी तालुक्यातील कल्लोळ याठिकाणी दूधगंगा नदीपात्रात (Dudhganga river) एका 17 वर्षीय विवाहित तरुणीचा (Married Woman) मृतदेह (Dead Body Found) आढळला आहे. संबंधित मुलीनं सासरी नांदायला नकार दिल्यानं बापानेचं तिच्यासोबत अमानुष कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे आणि तिची हत्या करणे अशा दुहेरी गुन्ह्यात आरोपी वडील अडकण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, साक्षी दशरथ काटकर असं मृत्यू झालेल्या 17 वर्षीय विवाहित तरुणीचं नाव आहे. संबंधित मुलगी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर चिकोडी तालुक्यातील कल्लोळ याठिकाणी दूधगंगा नदीपात्रात तिचा मृतदेह आढळला आहे. मुलीनं सासरी नांदायला नकार दिल्यानं वडिलांनीच पोटच्या लेकीला नदीत ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबत पोलिसांनी अद्याप पुष्टी केली नाही. हेही वाचा- नाशिक: बदली रद्द करण्यासाठी तलाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; घरी बोलवून वरिष्ठाचं अश्लील कृत्य सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मृत तरुणीचे वडील दशरथ काटकर यांना अटक केली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी वडिलानं दानवाड पुलावरून आपल्या मुलीला दूधगंगा नदीपात्रात ढकलून दिलं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बचाव दलाच्या मदतीनं रविवारपासून शोधमोहिम राबवली होती. सोमवारी सायंकाळी कल्लोळ गावच्या हद्दीत नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळला आहे. हेही वाचा- प्रेयसी गर्भवती होताच लग्नाला नकार देत प्रियकर फरार; पोलिसांनी मिळवून दिला न्याय मृतदेह आढळल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा मृतदेहाचा पंचनामा करण्याच काम सुरू होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण ही हत्या आहे की आत्महत्या याबाबतच कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. वडिलांची कसून चौकशी केली जात असून लवकरत मृत्यूचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.