इचलकरंजी, 03 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे दोन दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक घटना घडली होती. येथील एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकून दिलं (father threw 5 years old son into panchganga river) होतं. या घटनेनंतर दोन दिवसांनी चिमुकल्याचा मृतदेह कृष्णा नदीत आढळून (Dead body found in krushna river) आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.
सिकंदर हुसेन मुल्ला असं अटक करण्यात आलेल्या 48 वर्षीय आरोपी बापाचं नाव आहे. तर अफान मुल्ला असं मृत पावलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी सिकंदर मुल्लाने मुलाच्या उपचाराचा खर्च परवड नाही, म्हणून पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं होतं. यानंतर आरोपीनं स्वत: घरी येऊन आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली होती. यानंतर नातेवाईकांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं असता, आरोपीनं आपल्या गुन्ह्याच्या कबुली दिली आहे.
हेही वाचा- पोटच्या मुलासोबत करायची धक्कादायक कृत्य; महिलेचा प्रताप वाचून व्हाल सुन्न
गुरुवारी रात्री आरोपीनं पंचगंगा नदीत मुलाला फेकल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून याच नदीत मुलाचा शोध घेतला जात होता. अखेर शनिवारी कुरुंदवाड येथील कृष्णा नदीत अफानचा मृतदेह सापडला आहे. याठिकाणी कृष्णा नदीत मासेमारी करणाऱ्या अरुण नाईक यांना हा मृतदेह दिसला होता. यानंतर त्यांनी याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिली.
हेही वाचा-जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! पित्यानेच पोटच्या लेकराला नदीत फेकलं
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृत मुलाची ओळख पटल्यानंतर दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत पोलीस आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम करत होते. मृत मुलाला फिट्स येण्याचा त्रास होता. तर आरोपी वडील हे अपंग असून मुलाच्या उपचाराचा खर्च त्याला झेपत नव्हता. याच कारणातून आरोपीनं पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं होतं.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.