जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 100 रुपयांसाठी पोटच्या मुलासोबत करायची धक्कादायक कृत्य; महिलेचा प्रताप वाचून व्हाल सुन्न

100 रुपयांसाठी पोटच्या मुलासोबत करायची धक्कादायक कृत्य; महिलेचा प्रताप वाचून व्हाल सुन्न

फोटो क्रेडिट : द सन

फोटो क्रेडिट : द सन

महिला दररोज आपलं 10 महिन्यांचं बाळ भिकाऱ्यांना भाड्यानं देत (Mother Gave Her Baby on Rent) असे. भिखारी बाळाच्या पूर्ण शरीराला सिलव्हर कलरनं पेंट करत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : पैशासाठी एका आईनं (Mother) आपल्या लहान बाळासोबत (Baby Boy) असं काही केलं जे वाचून तुमचंही मन सुन्न होईल. हे प्रकरण इतकं धक्कादायक होतं, की समोर येताच महिलेला अटक करण्यात आली. सोबतच या बाळाला चाईल्ड केअर सेटंरमध्ये (Child Care Center) पाठवण्यात आलं. ही महिला केवळ 100 रुपयांसाठी आपल्या जिवंत बाळाला ममी (Mummy) बनवत असे. लग्नातच नवरदेवाने दाखवले नको ते रंग; रागाने लालभडक झाली नवरीबाई; Video viral इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ दक्षिण तंगेरांगमध्ये राहणारी महिला दररोज आपलं 10 महिन्यांचं बाळ भिकाऱ्यांना भाड्यानं देत (Mother Gave Her Baby on Rent) असे. भिखारी बाळाच्या पूर्ण शरीराला सिलव्हर कलरनं पेंट करून त्याला मृतदेहाप्रमाणे रूप देत असे आणि नंतर त्याला स्थिर ठेवून रस्त्याच्या कडेला बसून त्याच्या नावानं भीक मागत असे. यासाठी महिलेला दररोज 100 रुपये दिले जात असे. या बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी लहान मुलांचं शोषण केल्याप्रकरणी ही कारवाई केली. द सनच्या वृत्तानुसार, महिला दररोज सकाळी आपलं बाळ भाड्यानं देत असे. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केलं आहे. दक्षिण तंगेरांगचे सोशल सर्व्हिस डिपार्टमेंट प्रमुख वाहुनोते लुकमान म्हणाले, सोशल मीडियावर बाळाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला. मंत्रालयानं आई आणि बाळ दोघांना ताब्यात घेतलं. आम्ही बाळाच्या उत्तम भविष्यासाठी काम करू. सोबतच बाळाच्या बालकांनी कोणत्या कारणामुळे एवढा मोठा निर्णय घेतला, याचीही चौकशी करू. त्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आम्ही त्यांनी स्किल्ड बनवू. VIDEO: तोल गेला अन् धाडकन पाण्यात कोसळला सिंह, पाहा पुढे काय घडलं कोरोना महामारीमुळे रोजगाराची मोठी समस्या उभी राहिल्यानं इंडोनेशियात सिल्वहर रंग लावून रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. हे लोक पैसे कमवण्यासाठी भीक मागतात. मात्र, सिल्वहर रंग अनेक त्वचारोगांना आमंत्रण देतो. लहान मुलांच्या आरोग्यासाठी तर हा केमिकल असणारा रंग अत्यंत हानिकारक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात