मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

चहासाठी बाप बनला राक्षस; चिमुकल्याला आधी भिंतीवर आपटलं मग छातीत मारला ठोसा, तळतळत सोडला जीव

चहासाठी बाप बनला राक्षस; चिमुकल्याला आधी भिंतीवर आपटलं मग छातीत मारला ठोसा, तळतळत सोडला जीव

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपली चहाची तलप पूर्ण करण्यासाठी पोटच्या मुलाची निर्घृण हत्या (Father Killed son) केली आहे.

  • Published by:  News18 Desk
कोल्हापूर, 07 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपली चहाची तलप पूर्ण करण्यासाठी पोटच्या मुलाची निर्घृण हत्या (Father Killed son) केली आहे. आरोपी वडिलांनी चिमुकल्याला भिंतीवर आपटून त्याच्या छातीत जोरदार ठोसा मारला आहे. बापाच्या या राक्षसी कृत्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीच्या मारहाणीत चिमुकल्याच्या छातीच्या दोन बरगड्या देखील तुटल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत. आरव केसरे असं हत्या झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तर राकेश रंगराव केसरे असं हत्या करणाऱ्या बापाचं नाव असून तो शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील रहिवासी आहे. आरोपी राकेश हा एका हॉटेलमध्ये काम करतो. दरम्यान, रविवारी सायंकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी आरोपीला चहा पिण्याची तलप झाली होती. त्यामुळे आरोपी राकेशनं मृत आरवला घराबाहेर गेलेल्या पत्नीला बोलावून आणण्यास सांगितलं. पण चिमुकल्या आरावनं वडिलांचं काम करण्यास नकार दिला. हेही वाचा-लघवीला गेला अन् 97 लाखांना मुकला; पुण्यातील व्यावसायिकासोबत घडली विपरीत घटना पोटच्या मुलानं काम करण्यास नकार दिल्यानं आरोपीनं रागाच्या भरात आरवला भिंतीवर जोरात आपटलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मुलाच्या छातीस जोरदार ठोसा मारला. हा ठोसा इतका भयंकर होता, की यामध्ये चिमुकल्याच्या छातीच्या दोन बरगड्या तुटल्या अन् तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर आरोपीनं मुलाचा गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर घरामागील पडक्या खोलीत मृतदेह लपवून ठेवला. हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी तसेच हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी राकेशनं मुलगा आरव बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी राकेश निमूटपणे सरूड येथील हॉटेलवर कामासाठी निघून गेला. दरम्यान आरवचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. आरोपीनं आरवच्या मृतदेहावर हळद कुंकू टाकून संबंधित प्रकार नरबळीचा असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी गावातील आरोपीचे नातलग आणि अन्य स्थानिक नागरिकांशी चौकशी केली असता, कोणीतरी जवळच्या व्यक्तीनं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
First published:

Tags: Crime news, Kolhapur

पुढील बातम्या