जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / तीन महिन्यातच मोडला संसार; कोरोनाच्या धास्तीनं अभियंत्यानं संपवलं जीवन, सांगलीतील घटना

तीन महिन्यातच मोडला संसार; कोरोनाच्या धास्तीनं अभियंत्यानं संपवलं जीवन, सांगलीतील घटना

तीन महिन्यातच मोडला संसार; कोरोनाच्या धास्तीनं अभियंत्यानं संपवलं जीवन, सांगलीतील घटना

Suicide in Sangli: सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील एका 28 वर्षीय अभियंता तरुणानं कोरोना विषाणूच्या धास्तीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामपूर, 16 जुलै: सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील एका 28 वर्षीय अभियंता तरुणानं (Engineer commits suicide) कोरोना विषाणूच्या धास्तीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाला चार दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्याला घरीच विलगीकरण करण्यात आलं होतं. दरम्यान काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानं, त्यानं आपल्या वडिलांकडे दूधाची मागणी केली. वडिलांनी त्याला दूध आणून दिलं. पण पहाटे पाचच्या सुमारास वडिलांना जाग आली असता, बाजूच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. निखिल लक्ष्मण भानुसे असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत निखिल हा बांधकाम क्षेत्रांत अभियंता म्हणून कार्यरत होता. अलकडेच एप्रिल महिन्यात निखिलचा विवाह झाला होता. सर्वकाही सुखात सुरू होतं. पण चार दिवसांपूर्व कोरोना विषाणूची लागण झाल्यानं निखिल पार खचून गेला. कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे त्याला नैराश्य आलं. यातूनचं त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा- गुटखा पुडी न दिल्यानं तरुणाची सटकली; तलवारीनं मित्रावरच केला जीवघेणा हल्ला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या औषधं घेत त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री वडिलांनी निखिलला त्याच्या खोलीत जेवणही आणून दिलं. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. रात्री उशीरा साडेबाराच्या सुमारास निखिल झोपेतून उठला. हेही वाचा- नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; ब्लॅकमेल करत 5 वर्षे अत्याचार त्यानं आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगत वडिलांकडे दूध मागितलं. वडिलांनी त्याला दूध आणून दिलं आणि पुन्हा झोपण्यासाठी निघून गेले. पण इकडे मृत निखिलच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं. वडिल साडे पाचच्या समुरास उठले. तेव्हा त्यांना घराच्या बाजूच्या असणाऱ्या शेडमधील लोखंडी अँगलला निखिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात