Home /News /kolhapur /

संतापजनक! नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; ब्लॅकमेल करत 5 वर्षे अत्याचार

संतापजनक! नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; ब्लॅकमेल करत 5 वर्षे अत्याचार

Rape in Kolhapur: नववीच्या विद्यार्थिनीला (9th Grade student) प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर सलग पाच वर्षे अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    कोल्हापूर, 16 जुलै: नववीच्या विद्यार्थिनीला (9th Grade student) प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर सलग पाच वर्षे अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं मोबाइलवर काढलेले अश्लील फोटो (Obscene photo) व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत, तिच्यावर अनेक वेळा बलात्कार  केला आहे. मागील पाच वर्षांपासून आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बल्कार केला आहे. पीडित मुलीनं सज्ञान झाल्यावर आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली. पण आरोपीनं लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. याप्रकरणी पीडितेनं गुरूवारी पोलिसांत फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. पोलिसांनी रात्री उशीरा आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrest) आहेत. उद्धव किरण महाडिक असं अटक केलेल्या 26 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो कोल्हापूरातील जुना बुधवार पेठ परिसरातील निकम गल्लीत राहातो. आरोपीनं पीडित मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असताना, तिचा पाठलाग करत प्रेमसंबंधासाठी विचारणा केली होती. पीडित मुलगीही अज्ञान असल्यानं आरोपीच्या जाळ्यात अडकली. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेच्या अज्ञानपणाचा फायदा घेते, तिचे काही अश्लील फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढले. हेही वाचा-लव्ह, सेक्स आणि..! विवाहित प्रियकरानं गर्लफ्रेंडचा घेतला सूड; आयुष्य उद्धवस्त यानंतर आरोपीनं संबंधित फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी देत आणि लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं जुलै 2016 पासून जुलै 2021 पर्यंत तब्बल पाच वर्षे पीडितेला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. पण पीडिता सज्ञान झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला. पण संशयित आरोपीनं पीडित मुलीला लग्नासाठी नकार दिला. हेही वाचा-पुणे: FBवरून मैत्री करत युवकाचा विवाहितेवर बलात्कार, स्टेटसला ठेवले अश्लील VIDEO याप्रकरणी पीडित मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपी उद्धव किरण महाडिक याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बलात्कार, लग्नाचं आमिष दाखवत लैंगिक शोषण आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी रात्री उशीरा आरोपी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur, Rape news

    पुढील बातम्या