नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : देशभरातील विविध राज्यातील मुलं UPSC चा (Union Public Service Commission,) अभ्यास करण्यासाठी पुणे किंवा दिल्लीसारखा (Students Go to Pune or Delhi to UPSC study ) पर्याय निवडतात. तेथे एखादं घर भाड्यानं घेऊन तिथं दिवस-रात्र अभ्यास करतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी करतात. दरम्यान दिल्लीतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. दिल्लीतील राजेंद्र नगर (Rajendra Nagar) भागातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या ( UPSC candidate commits suicide) केली आहे. तिचा मृतदेह ती राहत असलेल्या खोलीत गळफास (UPSC ) घेतलेल्या अवस्थेत सापडला.
मृत तरुणीच नाव आकांश असून वय 25 वर्षे होतं. आकांक्षा राजेंद्र नगर येथे राहून UPSC ची तयारी करीत होती. रविवारी UPSC ची प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam) होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आकांक्षा ही राजेंद्र नगर भागात भाड्यात घर घेऊन राहत होती. येथे राहून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. शुक्रवारी रात्री उशिरा तिचा मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरवाजा आतून बंद होता. यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
हे ही वाचा-प्रेमास नकार दिल्यानं तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा; आत्महत्येसाठी टेरेसवर चढला अन्
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आकांक्षाचा मृतदेह त्यांनी खाली उतरवला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत घर मालकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्यांना घटनास्थळावरुन सुसाइट नोट सापडली नाही. त्याशिवाय आकांशाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढललेल्या नाहीत. रविवारी होणाऱ्या UPSC च्या प्राथमिक परीक्षेच्या दबावातून आकांक्षाने आत्महत्येसारखं पाऊल उचललं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे.
आत्महत्या हा कोणत्याच प्रश्नावरील उत्तर असू शकत नाही. कोणालाही काही मानसिक ताण असला तरी त्यांनी तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करावा आणि आलेल्या संकटाला स्वत:चे 100 टक्के सामना करावा. आणि इतरांनाही याची प्रेरणा द्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Upsc, Upsc exam, Woman suicide