Coronavirus: कोल्हापूर, सांगलीने वाढवली चिंता; संपूर्ण Lockdown करण्याचा केंद्रीय टीमचा सल्ला

Coronavirus: कोल्हापूर, सांगलीने वाढवली चिंता; संपूर्ण Lockdown करण्याचा केंद्रीय टीमचा सल्ला

Coronavirus: राज्यातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कोल्हापूरचा दौरा करत कोविड स्थितीचा आढावा घेतला होता.

  • Share this:

कोल्हापूर, 20 जुलै: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) कमी होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत अद्यापही कोरोना बाधितांची संख्या ही अधिक असल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता केंद्रीय टीमने नुकताच या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा केला. हा दौरा केल्यानंतर केंद्रीय टीमने राज्यसरकारला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा दौरा करुन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय टीमने या दोन्ही जिल्ह्यांतील कोरोनाची वाढत्या संख्येवरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा सल्लाही दिला आहे. तर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय टीमच्या अहवालाची वाट पाहत आहेत.

"काँग्रेसला नक्की काय करायचे आहे, त्यांची दिशा कोणती" सामनातून शिवसेनेचा निशाणा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात 10 असे जिल्हे आहेत जेथे पॉझिटिव्हिटी दर हा खूपच जास्त आहे. केंद्रीय टीमने या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या जिल्ह्यांत कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आणि लसीकरण वाढवण्यासा सल्लाही केंद्रीय टीमने दिला आहे. आम्ही सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत आहोत.

मी लवकरच दिल्लीत जाणार असून यावेळी कोरोनाच्या लसींचा अधिक पुरवठा करण्यात यावा यासाठी केंद्राकडे मागणी करण्यात येणार आहे. तर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे डायरेक्टर डॉ. सुजीत सिंह यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर नाहीयेना या संदर्भातही आम्ही तपास करत आहोत.

Published by: Sunil Desale
First published: July 20, 2021, 10:05 AM IST

ताज्या बातम्या