मुंबई, 20 जुलै: राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेस पक्षावर (Congress Party) निशाणा साधला आहे. शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनातील संपादकीयच्या (Saamana editorial) माध्यमातून काँग्रेस पक्षात नेमकं चाललं तरी काय असा सवाल उपस्थित केला आहे. सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे, काँग्रेस पक्षात सध्या काही उलाढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनिया गांधींच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहिती. पक्षातून डरपोक जात राहिले तरी… सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील. पण कार्यकर्त्यंना ऊर्जा देणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात हे बरोबर आहे. पण पक्षातून डरपोक जात राहिले तर काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय हे पहावे लागेल असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे. महाविकास आघाडीत धुसफूस?; अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल पक्षाला नक्की काय करायचे? जी 23 या काँग्रेस अंतर्गत गटानेही धुसफूस सुरू केली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा जी 23 म्हणजे धुसफूस गट आज कार्यरत आहे. या धुसफूस गटामागेही संघ परिवारच असावा असे राहुल गांधींचे मत असू शकते. काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे असं म्हणत शिवसेनेने काँग्रेसवर निसाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपपेक्षा दारुण पराभव काँग्रेसचा झाला. उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश हे मोठे प्रदेश कधीकाळी काँग्रेसचे गड होतेच. आज तेथे काँग्रेससाठी परिस्थिती कठीण आहे. प्रियंका गांधी शिकस्त करतील पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे असंही सामनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.