मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /घोड्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजपासून कोल्हापुरात Corona औषध विकसित, 90 तासांत बरा होणार रुग्ण

घोड्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजपासून कोल्हापुरात Corona औषध विकसित, 90 तासांत बरा होणार रुग्ण

 कोरोना संसर्ग झाल्यानंतर मानवी शरीरात ज्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार होतात, तशाच या अँटीबॉडीज होत्या. या अँटीबॉडीज उच्च गुणवत्तेची प्रक्रिया वापरून शुद्ध करण्यात आल्या.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर मानवी शरीरात ज्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार होतात, तशाच या अँटीबॉडीज होत्या. या अँटीबॉडीज उच्च गुणवत्तेची प्रक्रिया वापरून शुद्ध करण्यात आल्या.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर मानवी शरीरात ज्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार होतात, तशाच या अँटीबॉडीज होत्या. या अँटीबॉडीज उच्च गुणवत्तेची प्रक्रिया वापरून शुद्ध करण्यात आल्या.

कोल्हापूर, 11 ऑगस्ट: कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधण्याकरिता शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. वेगवेगळ्या लशी विकसित करण्यात आल्या असून, कोरोना संसर्गातून उद्भवणाऱ्या आजाराची गंभीरता कमी करण्यासाठी, तसंच मृत्यूची शक्यता कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होत आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्ग झाल्यास तो नियंत्रणात आणण्यासाठीही प्रभावी उपचार, औषधं विकसित करण्यात शास्त्रज्ञ गर्क आहेत. कोल्हापूरमधल्या (Kolhapur) आयसेरा बायॉलॉजिकल या कंपनीचाही त्यात समावेश आहे. या कंपनीने घोड्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजपासून (Horse Antibodies) एक औषध विकसित केलं असून, ते कोरोनाबाधितांवर (Anti Covid Medicine) उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्या औषधाच्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सध्या सुरू असून, तीन टप्प्यांतल्या चाचण्या यशस्वी झाल्यास त्या औषधाचा प्रत्यक्ष वापर रुग्णांवर केला जाऊ शकेल. तसं झालं, तर अशा प्रकारचं हे पहिलंच स्वदेशी औषध ठरेल. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या हवाल्याने 'अमर उजाला'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे (iSERA Biological) संचालक (न्यू प्रॉडक्ट) नंदकुमार कदम यांनी या औषधासंदर्भातली माहिती दिली. 'घोडा हा मोठा प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार करू शकतात. त्यामुळे यासाठी त्यांची निवड करण्यात आली. लस दिल्यानंतर ज्याप्रमाणे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, तीच प्रक्रिया इथे वापरण्यात आली. विषाणूमधून काढण्यात आलेलं विशेष प्रकारचं अँटीजेन घोड्यांना टोचण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. कोरोना संसर्ग झाल्यानंतर मानवी शरीरात ज्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार होतात, तशाच या अँटीबॉडीज होत्या. या अँटीबॉडीज उच्च गुणवत्तेची प्रक्रिया वापरून शुद्ध करण्यात आल्या. त्या कमीत कमी 95 टक्के शुद्ध असतील, याची काळजी घेण्यात आली. या अँटीबॉडीज कोविड-19ला निष्प्रभ करणाऱ्या आहेत,' असं कदम म्हणाले.

मंगळवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद, राज्यात वाढला मृतांचा आकडा; रिकव्हरी रेट 96.8

'घोड्यांच्या शरीरात टोचण्याकरिता योग्य अँटीजेनची (Antigen) निवड करण्यासाठी आम्हाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या संस्थेने मदत केली. तसंच, संसर्गग्रस्त शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या रसायनाची निवड करण्यासाठीही त्या संस्थेने मदत केली,' असंही कदम यांनी नमूद केलं.

'हे औषध पॉलिक्लोनल अँटीबॉडीजचं (Polyclonal Antibodies) मिश्रण आहे. मोनोक्लोनल उत्पादनांच्या तुलनेत विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी हे मिश्रण अधिक प्रभावी आहे. महत्त्वाचं म्हणजे हे औषध कोरोना विषाणूच्या जुन्या आणि नव्या व्हॅरिएंट्सवरही प्रभावी ठरेल, अशी शक्यता आहे,' असं कदम यांनी स्पष्ट केलं.

'या औषधाच्या सध्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या (Human Trials) सुरू आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या घेण्याचं कंपनीचं नियोजन आहे. सगळ्या चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक निघाले, तर चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत कंपनी हे औषध बाजारपेठेत आणू शकते. औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत काही हजार रुपये असू शकेल. कोरोनाबाधिताला संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजे संसर्ग शरीरभर पसरलेला नसताना हे औषध द्यावं लागणार आहे,' असंही कदम यांनी सांगितलं.

कोरोना व्हेरिएंट येतच राहणार कारण...; चीनच्या वुहान लॅबमधील 'बॅट वुमन'ने दिला इशारा

हे औषध सौम्य आणि मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपयुक्त ठरणार आहे. औषधाच्या पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या चालू महिन्याच्या अखेरीला संपतील. या औषधाचा वापर केल्यानंतर कोरोनाबाधितांचा आरटी-पीसीआर रिपोर्ट 72 ते 90 तासांत निगेटिव्ह येत असल्याचं आतापर्यंतच्या निष्कर्षांतून समजतं आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे माजी महासंचालक प्रा. एन. के. गांगुली यांनी सांगितलं, 'आतापर्यंत तरी या औषधाने आशा पल्लवित केल्या आहेत; मात्र आपल्याला मानवी चाचण्यांच्या निष्कर्षांची वाट पाहावी लागेल. हे औषध सर्व निकषांमध्ये बसलं, तर भारतासारख्या देशात कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या युद्धात ते महत्त्वपूर्ण ठरेल. बाजारात उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या तुलनेत त्याची किंमत कमी असेल, असंही मला वाटतं.'

आयसेरा बायोलॉजिकल ही चार वर्षांपूर्वीच सुरू झालेली कंपनी असून, ती सर्पदंश, श्वानदंश, डिप्थिरिया आदींवरच्या औषधांची निर्मिती करते.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, Kolhapur