जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंगळवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद, राज्यात वाढला मृतांचा आकडा; रिकव्हरी रेट 96.8

मंगळवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद, राज्यात वाढला मृतांचा आकडा; रिकव्हरी रेट 96.8

मंगळवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद, राज्यात वाढला मृतांचा आकडा; रिकव्हरी रेट 96.8

Maharashtra Corona Virus Updates: राज्यात कोरोनाची (Corona Virus) रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा मृतांचा आकडा वाढला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट: राज्यात कोरोनाची (Corona Virus) रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात (Maharashtra State Corona Virus) मंगळवारी दिवसभरात 5,609 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 63,63,442 झाली आहे. तसेच राज्यात मृत्यूचा (Death) आकडा पुन्हा वाढला असून काल 137 रुग्ण दगावले. तसेच काल एकूण 7 हजार 720 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण 61,59,673 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)96.8 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सोमवारी तर 68 जणांचा मृत्यू झाला होता. तर हीच संख्या रविवारी 151 एवढी होती. मंगळवारी पुन्हा एकदा त्यात वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात दिवसभरात 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 63,63, 442 झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1,34,201 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली. तर सध्या राज्यातील मृत्यू दर 2.1टक्के एवढा आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 66,123 इतकी झाली. पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) काल सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 46 मृत्यूची नोंद झाली. पुण्यात सर्वाधिक 13 हजार 892अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर 7 हजार 297अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. सातारा जिल्ह्यात ही संख्या 6 हजार 469, अहमदनगर जिल्ह्यात 6 हजार 192, ठाणे जिल्ह्यात 6 हजार 70 तर मुंबई महापालिका क्षेत्रात 4 हजार 501 इतकी आहे. रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय ठाणे 19, नाशिक 11, कोल्हापूर 43, औरंगाबाद 8, लातूर 5, अकोला 4 तर नागपूर मंडळात 1 मृत्यू नोंदवला गेला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,34,201 वर पोहोचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात