Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना व्हेरिएंट येतच राहणार कारण...; चीनच्या वुहान लॅबमधील 'बॅट वुमन'ने दिला इशारा

कोरोना व्हेरिएंट येतच राहणार कारण...; चीनच्या वुहान लॅबमधील 'बॅट वुमन'ने दिला इशारा

चीनच्या वुहान लॅबमधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली.

चीनच्या वुहान लॅबमधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली.

डेल्टा प्लसची प्रकरणं वाढत असताना चिनी शास्त्रज्ञाच्या इशाऱ्यामुळे आता चिंता वाढली आहे.

बीजिंग, 10 ऑगस्ट :  भारतात विशेषतः महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून डेल्टा प्लस (Delta plus) कोरोनाचे (Coronavirus)  रुग्ण आढळत आहे. डेल्टाशिवाय काही दिवसांपूर्वीच भारतात कोरोनाचा एटा व्हेरिएंटही सापडला. याचदरम्यान आता चिनी शास्त्रज्ञाने धक्कादायक माहिती दिली आहे. असे कोरोनाचे नवे व्हेरियंट सातत्याने येत राहतील अशी भविष्यवाणी बॅट वुमन (Bat Women) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमधील (China) वुहान लॅबमधील (Wuhan Lab) प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली (Virologist She Zhengli) यांनी केली आहे. कोरोनाबाबत सध्या सर्वच स्तरांवर सखोल संशोधन सुरू आहे. या संशोधनातून कोरोनाचे नवनवे व्हेरियंट समोर येत आहेत. याचाच अर्थ कोरोना आपले रुप सातत्याने बदलत आहे. पुढील काळातही कोरोनाचे नवे व्हेरियंट समोर येत राहतील. हा विषाणू आता खूप मोठा झाला आहे. त्यामुळे त्याचे म्युटेशन (Mutation) होत असून व्हेरियंटस समोर येत आहेत, असं शी झेंगली यांनी सांगितलं. हे वाचा - इबोला अन् कोरोनाहून घातक विषाणूचं जगावर संकट; मारबर्ग विषाणूबाबत WHOने केलं सावध याआधी बायोएनटेकचे (Bio N Tech) सीईओ उगुर साहिन यांनी देखील येत्या 6 ते 12 महिन्यांत कोरोनाचे अजून व्हेरियंट समोर येतील अशी शक्यता व्यक्त केली होती. जगभरात कोरोना संसर्गासाठी कारणीभूत मानल्या जाणाऱ्या वुहानमध्ये मागील काही महिन्यांपासून एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नव्हती. मात्र गेल्या काही आठवड्यांतच कोरोनाचा जास्त संसर्गजन्य डेल्टा (Delta) व्हेरियंट चीनमध्ये वेगाने पसरताना दिसत आहे. चीनमधील नानजिंग हा भाग या विषाणूचा केंद्रबिंदू बनला आहे. हे वाचा - धक्कादायक! देशातील निम्म्यापेक्षा जास्त Delta plus रुग्ण एकट्या महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात स्थलांतरीत कामगारांमध्ये कोरोनाबाधित आढळून आल्यावर चिनी अधिकाऱ्यांनी 28,000 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने वुहानमधील 1 कोटींपेक्षा जास्त रहिवाश्यांची कोविड टेस्ट केली. या पार्श्वभूमीवर व्हायरॉलॉजिस्ट शी झेंगली म्हणाल्या, की आपण या स्थितीला न घाबरता, या विषाणूसोबत आपल्याला दीर्घकाळ राहयचे आहे, अशी मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन शी झेंगली यांनी केले आहे.
First published:

Tags: China, Coronavirus

पुढील बातम्या