कोल्हापूर, 25 मार्च : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरातील दहा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळेच महाराष्ट्राशेजारच्या राज्यांना आता धडकी भरली आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Karnataka governments Belgaum district closed all borders of Maharashtra) बेळगाव जिल्ह्यातील सगळ्या ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आजपासून या सीमा बंद करण्यात आल्या असून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी कागवाड निपाणी संकेश्वर या तालुक्यांना लागून ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राची हद्द आहे, त्या हद्दीतील रस्ते बंद करण्यात आले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने मातीचे ढिगारे टाकून आणि काटेरी झाडे टाकून हे रस्ते बंद करण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी दुधगंगा वेदगंगा नदीवरचे अनेक पुलही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. मात्र इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घालण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पण याचा परिणाम सीमा भागातील अनेक गावांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा- ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ ‘नापास’, विद्यार्थी संतापले! महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गावे 1, 2 किलोमीटरच्या अंतरांवर आहेत. भाजीपाला शेतीमाल यासाठी दोन्ही राज्यातील गावकरी ये जा करत असतात. त्यांना आता ही ये-जा करता येणार नाही. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाका आणि इचलकरंजी मार्गे बोरगाव येथे कर्नाटकात जाण्यासाठी RTPCR प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आल आहे. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय बेळगाव जिल्हा किंवा कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. पंधरा दिवसांपूर्वीच कोगणोळी टोलनाक्यावर बेळगाव जिल्हा प्रशासनाने चेक पोस्ट उभा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आता पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सीमा भागातील अनेक गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारांमध्ये दोन्ही गावांमधील व्यापारी व्यापार करतात. त्यानाही या सीमा बंदचा मोठा फटका बसणार आहे. कडकडीत लॉकडाउन असताना सीमा भागातील गावांमध्ये जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता यापुढेही पाहायला मिळत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.