Home /News /nagpur /

ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ 'नापास', विद्यार्थी संतापले!

ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ 'नापास', विद्यार्थी संतापले!

नागपूरमध्ये आज सलग नवव्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा हा तीन हजारावर गेला आहे.

    तुषार काहोळे/ नागपूर, 25 मार्च : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. अनेक विद्यापीठांना ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अडचणी जाणवत आहे. (Nagpur University fails on first day of online exams ) अशातच नागपूर विद्यापीठाने बीएससी, बीकॉम, बीई, बीबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांचं ऑनलाइन आयोजन केलं होतं. मात्र पहिल्याचं दिवशी सर्व परीक्षा रद्द करण्याची वेळ विद्यापीठावर ओढवली आहे. अचानक विद्यापीठाचं सर्वर डाऊन झाल्याने सर्व परीक्ष रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्यात नापास ठरलं आहे. आज बीएससी, बीकॉम, बीई, बीबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार होत्या. या सर्व प्रकारामुळे  विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाला स्वतःची लेटलतीफी भोवली, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. तीन दिवसांआधी एक खाजगी कंपनीला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे ही वाचा-..तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती सध्या नागपूरात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. नागरिकांचं दुर्लक्ष आणि कोरोना नियमांचं पालन करण्यात होणारा निष्काळजीपणा यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. नागपूरमध्ये आज सलग नवव्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा हा तीन हजारावर गेला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 35 हजारच्या घरात गेला आहे. मागच्या चोवीस तासात 3579 नवीन रुग्ण आढळले असून 47 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरमधील आरोग्य यंत्रणेवरील दवाब वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. 20 मार्च 3679 21 मार्च 3614 22 मार्च 3596 23 मार्च 3095 24 मार्च 3717
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Nagpur

    पुढील बातम्या