मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

"मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली"- चंद्रकांत पाटील

"मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली"- चंद्रकांत पाटील

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करत कठोर निर्बंध लागू केले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करत कठोर निर्बंध लागू केले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करत कठोर निर्बंध लागू केले आहेत.

कोल्हापूर, 13 एप्रिल: राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ 105 रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब 105 रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हे पण वाचा : Oxygen Airlift: राज्यात ऑक्सिजनची कमतरता; उद्धव ठाकरेंची मोदींना साद, इतर राज्यांतून Oxygen एअरलिफ्ट करण्याची मागणी राज्यात कठोर निर्बंध लागू कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात उद्या बुधवार दि 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
First published:

Tags: Lockdown, Maharashtra, Uddhav thackeray

पुढील बातम्या