बीड, 01 ऑक्टोबर: मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबला आहे. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेकांना स्मार्ट फोन घेणं परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. अशात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Student Suicide) केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. यानंतर आता बीडमधून देखील अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं वडिलांच्या गरीबीला कंटाळून मृत्यूला कवटाळलं (10th grade student commits suicide due to poverty) आहे. वडिलांची कमाई जेमतेम असल्याने शैक्षणिक खर्च आणि घरखर्च भागत नसल्याने नैराश्यात गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वडिलांवर शिक्षणाचा आर्थिक ताण येत असल्याच्या कारणातून तिने विष प्राशन (Suicide by drink poison) केल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना उघडकीस येताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा- रात्री आईला बोलून दाखवली खंत, सकाळी आढळला मृतावस्थेत, औरंगाबादेत MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या दैवशाला राठोड असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव असून ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. मृत दैवशाला ही बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील येवता परिसरातील एका तांड्यावर राहत होती. वडिलांची गरीबीची परिस्थिती असल्याने तिचा शैक्षणिक खर्च आणि घरचा खर्च भागवण्यात त्यांची ओढाताण सुरू होती. याची जाण मृत दैवशाला हिला होता. वडिलांची ओढाताण बघवत नसल्यानं तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. याच कारणातून तिने 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी पावणे एकच्या सुमारास विष प्राशन केलं. हेही वाचा- व्यायाम करताना घडलं भलतंच; सांगलीत बड्या डॉक्टरचा जिममध्येच मृत्यू दैवशालानं विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, कुटुंबीयांनी तिला त्वरित अंबाजोगाई येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी दैवशालाचा भाऊ बाळासाहेब राठोड याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.