'गड आला पण सिंह गेला', सामनावीर ठरलेल्या क्रिकेटपटूला मैदानातच मृत्यूने गाठलं

'गड आला पण सिंह गेला', सामनावीर ठरलेल्या क्रिकेटपटूला मैदानातच मृत्यूने गाठलं

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील अंबप गावात एका क्रिकेटपटूचा मैदानाच दुर्दैवी अंत (Cricket player died in ground) झाला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 09 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील अंबप गावात एका क्रिकेटपटूचा मैदानाच दुर्दैवी अंत (Cricket player died in ground) झाला आहे. संबंधित खेळाडूने आपल्या संघाला सामना जिंकून देत, सामनावीराचा पुरस्कार (Become man of the match) पटकावला होता. पण मॅच संपल्यानंतर, काही वेळाने अचानक मैदानात त्याला हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला आहे. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. गुणी आणि मनमिळावू स्वभावाच्या खेळाडूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमर साबळे असं मृत पावलेल्या 32 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी गावातील रहिवासी होता. अंबप येथे गुरुवारपासून अंबप स्पोर्ट्स आणि अशोकराव माने ग्रुप यांच्या वतीने अंबप प्रीमिअर लीग क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर हे सामने खेळवले जात होते.

हेही वाचा-बापाच्या डोळ्यादेखत चिमुकलीनं तडफडून सोडला प्राण;सोलापुरातील हृदय पिळवटणारी घटना

दरम्यान, सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक क्रिकेट सामना संपला. या सामन्यात अंबपवाडी राजमंगल स्पोर्ट्सचा खेळाडू अमर साबळे याने अष्टपैलू कामगिरी करत आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. त्यामुळे त्याला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला. सामना संपल्यानंतर, अमरला मैदानात अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर आयोजकांनी आणि अन्य खेळाडूंनी अमरला त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

हेही वाचा-मंजूर कर्ज देण्यास 3वर्षे टाळाटाळ; हवालदिल शेतकऱ्याने बँकेबाहेरच केला भयावह शेवट

पण प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी अमरला मृत घोषित केलं. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर अमरवर अंबपवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृत अमर हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गावात प्रसिद्ध होता. त्याची प्रकृती देखील ठणठणीत होती. अशा धडधाकट खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने अनेक खेळाडूंना धक्का बसला आहे.

Published by: News18 Desk
First published: November 9, 2021, 10:47 AM IST

ताज्या बातम्या