पोर्ले तर्फ ठाणे, 28 सप्टेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोला टच स्क्रीन मोबाइल (Touch screen Mobile Phone) घेऊन न दिल्याने, संबंधित 19 वर्षीय विवाहितेनं अर्ध्यावरच संसार मोडला आहे. मोबाइल घेऊन देत नसल्याच्या वैफल्यातून विवाहितेनं आपल्या राहत्या घरात गळफास (Wife commits suicide) घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पन्हाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
प्रियांका वैभव लोकरे असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पती वैभव लोकरे याने पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रियांका यांनी सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना, आपल्या राहत्या घरातील छताच्या बडोद्यास नॉयलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ टच स्क्रीन मोबाइल न मिळाल्याने महिलेनं आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-औरंगाबाद: नोटिशीमागेच कारण लिहित बळीराजाने मृत्यूला कवटाळलं; हृदय हेलावणारी घटना
फिर्यादी वैभव यांचा एक वर्षांपूर्वी शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील रहिवासी असणाऱ्या प्रियांकाशी विवाह झाला होता. वैभव हा गवंडी काम करत असून त्याची परिस्थिती गरिबीची आहे. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, पत्नी प्रियांका वैभव यांच्या फिरायला घेऊन जाण्यास आणि टच स्क्रीन मोबाइल घेऊन देण्यासाठी हट्ट करत होती.
हेही वाचा-रात्री मित्रासह पत्नीच्या खोलीत शिरला अन्...; 22वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस
पण परिस्थिती गरिबीची असल्याने वैभव आपल्या पत्नीचे हट्ट पुरवू शकला नाही. यातूनच प्रियांका यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पती वैभव यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून घेतला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Suicide