अहमदनगर, 27 सप्टेंबर: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी याठिकाणी नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका पतीने मित्राच्या मदतीने आपल्याच पत्नीसोबत विकृतीचा कळस गाठला (Husband and his friend gang raped married woman) आहे. पीडित तरुणीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या मदतीने संपर्क करत नातेवाईकांना आणि पोलिसांना या संतापजनक घटनेची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक (2 Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित तरुणी मुळची कल्याण येथील रहिवासी आहे. 2020 मध्ये तिचं लग्न पाथर्डी तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच पीडित विवाहितेचा तिच्या नवऱ्यासोबत वाद होऊ लागला. सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पीडित मुलगी आपल्या आजोबांकडे निघून गेली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी आरोपी पती पीडितेच्या घरी गेला. झालेल्या गोष्टी विसरून जा आणि नांदायला चल, असं समाजावून सांगितलं.
हेही वाचा-गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न; बायकोच्या अंगाला अंगारा लावला पण..
त्यामुळे पीडित विवाहितही नांदायला तयार झाली आणि नवऱ्यासोबत सासरी आली. पण सासरी राहत असताना, 22 सप्टेंबर रोजी रात्री तिचा पती आपल्या एका मित्रासह घरी आला. घरात शिरताच दोघंही पीडितेच्या खोलीत शिरले आणि आतून दरवाजा बंद केला. आपल्याला मूल हवं असल्याने तू माझ्या या मित्रासोबत शारिरीक संबंध ठेव, अशी गळ आरोपीने फिर्यादीला घातली. पण फिर्यादीने संताप व्यक्त करत थेट नकार दिला.
हेही वाचा-पुण्यातील तरुणीला अमेरिकेला नेत अमानुष छळ; बँक खात्यातून परस्पर काढले 48 लाख
पण नराधम पतीने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्या तोंडात दोन गोळ्या टाकल्या. यामुळे पीडितेला काही वेळातच गुंगी आली. यानंतर आरोपी पतीने आणि त्याच्या मित्राने आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर मध्य रात्री मित्र निघून गेला. शुद्ध आल्यानंतर पीडितेनं शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या मदतीने या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Rape