मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /नोटिशीमागेच कारण लिहित बळीराजाने मृत्यूला कवटाळलं; औरंगाबादेतील हृदय हेलावणारी घटना

नोटिशीमागेच कारण लिहित बळीराजाने मृत्यूला कवटाळलं; औरंगाबादेतील हृदय हेलावणारी घटना

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने नोटिशीमागे मृत्यूचं कारण लिहून आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे.

औरंगाबाद, 27 सप्टेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद येथे एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका शेतकरी कुटुंबाला फायनान्स कंपनीने (Finance Company Notice) दीड लाख रुपये कर्जाच्या बदल्यात वसुलीसाठी पाच लाखांपेक्षा अधिक रुपयांची नोटीस पाठवली आहे. कर्जाची रक्कम एवढी कशी वाढली आणि एवढे पैसे आणायचे कुठून या विवंचनेतून संबंधित शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं (Farmer Suicide) आहे. त्यांनी फायनान्स कंपनीच्या नोटिशीच्या पाठीमागच्या बाजूलाच मृत्यूचं कारण लिहिलं आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दादासाहेब लक्ष्मण ठेंगडे असं आत्महत्या करणाऱ्या 38 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून आपल्या घरावर दीड लाखांचं कर्ज घेतलं होतं. यातील काही रक्कम हफ्त्यांच्या स्वरुपात परतफेड केली होती. पण 8 सप्टेंबर रोजी संबंधित फायनान्स कंपनीने 5 लाख 24 हजार 346 रुपये रकमेची भरणा नोटीस पाठवली.

हेही वाचा-NCP च्या पदाधिकाऱ्याने ऑफिसमध्येच संपवलं जीवन; सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा

फायनान्स कंपनीची नोटीस पाहून मृत दादासाहेब आणि त्याचं कुटुंबीय चिंतेत होते. तिप्पट रकमेची नोटीस पाहून एवढे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न दादासाहेब आणि त्याच्या कुटुंबीयांना पडला होता. दरम्यान, रविवारी सकाळी 9 च्या सुमारास दादासाहेब यांनी संबंधित नोटिशीच्या मागे मृत्यूचं कारण लिहित आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

हेही वाचा-पुण्यातील तरुणीला अमेरिकेला नेत अमानुष छळ; बँक खात्यातून परस्पर काढले 48 लाख

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृत शेतकरी दादासाहेब यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी दादासाहेब यांच्या खिशात फायनान्स कंपनीची नोटीस आढळून आली आहे. या नोटिशीच्या पाठीमागच्या बाजूलाच त्यांनी मृत्यूचं कारण लिहिलं आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Aurangabad, Suicide case