मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /एक चूक अन् मसाई पठारावरून कार खोल दरीत कोसळली, 2 जण जागीच ठार

एक चूक अन् मसाई पठारावरून कार खोल दरीत कोसळली, 2 जण जागीच ठार

इचलकरंजी येथील रहिवासी असलेले पर्यटक आपल्या कारने मसाई पठारावर फिरण्यासाठी आले होते. मात्र, घाटात अंदाज चुकल्यामुळे कार खोल दरीत कोसळली.

इचलकरंजी येथील रहिवासी असलेले पर्यटक आपल्या कारने मसाई पठारावर फिरण्यासाठी आले होते. मात्र, घाटात अंदाज चुकल्यामुळे कार खोल दरीत कोसळली.

इचलकरंजी येथील रहिवासी असलेले पर्यटक आपल्या कारने मसाई पठारावर फिरण्यासाठी आले होते. मात्र, घाटात अंदाज चुकल्यामुळे कार खोल दरीत कोसळली.

कोल्हापूर, 06 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावर ( masai pathar kolhapur) फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार खोल दरीत कोसळल्याची (car Collapsed in the valley) घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले पन्हाळगडजवळ असलेल्या मसाई पठारावर आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला आहे. कबनुर इचलकरंजी येथील रहिवासी असलेले पर्यटक आपल्या कारने मसाई पठारावर फिरण्यासाठी आले होते. मात्र, घाटात अंदाज चुकल्यामुळे कार खोल दरीत कोसळली.

Shocking video : त्या दोघांनी पूर्ण ताकद लावली; पण प्रवाशासह दरीत कोसळली कार

हा अपघात इतका भीषण होता की, कार दरीत कोसळल्यानंतर चक्काचूर झाली आहे. मोठमोठ्याला दगडावर कार आदळल्यामुळे कारचा पार चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात चारचाकी कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

Twitter ची पलटी, Dhoni ला पुन्हा मिळाली ब्लू टिक, चाहत्यांच्या भन्नाट रिएक्शन्स

स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांनी दरीत उतरून जखमी तरुणाला बाहेर काढले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेमधून जखमीला रुग्णालयात हलवले आहे.

First published:
top videos