मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /काही तासात Twitter ची पलटी, Dhoni ला पुन्हा मिळाली ब्लू टिक, चाहत्यांच्या भन्नाट रिएक्शन्स

काही तासात Twitter ची पलटी, Dhoni ला पुन्हा मिळाली ब्लू टिक, चाहत्यांच्या भन्नाट रिएक्शन्स

एमएस धोनीला पुन्हा मिळाली ब्लू टिक

एमएस धोनीला पुन्हा मिळाली ब्लू टिक

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) त्याच्या ट्विटरची ब्लू टिक (Twitter Blue Tick) परत मिळाली आहे. काही तासांपूर्वी धोनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली होती.

मुंबई, 6 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) त्याच्या ट्विटरची ब्लू टिक (Twitter Blue Tick) परत मिळाली आहे. काही तासांपूर्वी धोनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली होती. बराच काळ ट्विटरवर सक्रीय नसल्यामुळे धोनीच्या अकाऊंटवरची ब्लू टिक हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं, पण आता पुन्हा एकदा धोनीला ब्लू टिक देण्यात आली आहे. ट्विटरकडून याबाबत अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

एमएस धोनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्विटरवर धोनीचे 8.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 2019 वर्ल्ड कप (2019 World Cup) सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून लांब होता. या कालावधीमध्ये त्याने लष्कराकडून ट्रेनिंग घेतलं.

15 ऑगस्टला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर धोनीने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने फक्त 4 ट्वीट केली होती. तर 2019 साली त्याने 7 ट्वीट केली. 2018 मध्ये धोनी ट्विटरवर ऍक्टिव्ह होता, कारण त्याने 20 पेक्षा जास्त ट्वीट केली होती. 2019 वर्ल्ड कपनंतर धोनी सोशल मीडियापासून लांब होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे. 40 वर्षांचा एमएस धोनी 2021 साली आयपीएलमध्ये खेळला, पण कोरोना व्हायरसमुळे 29 मॅचनंतर कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता आयपीएलच्या उरलेल्या मॅच सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने या मोसमात 7 मॅचपैकी 5 मॅच जिंकून 10 पॉईंट्स मिळवले.

First published:
top videos

    Tags: MS Dhoni, Twitter