मराठी बातम्या /बातम्या /india-china /

चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देणार भारत; आखला मोठा प्लॅन

चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देणार भारत; आखला मोठा प्लॅन

अद्याप १४ व्या फेरीची तारीख नक्की झालेली नाही. मात्र, हे निश्चित आहे की भारत यावेळीही चीनला हॉट स्प्रिंगमधून (Hot Springs) मागे हटण्यास सांगेल.

अद्याप १४ व्या फेरीची तारीख नक्की झालेली नाही. मात्र, हे निश्चित आहे की भारत यावेळीही चीनला हॉट स्प्रिंगमधून (Hot Springs) मागे हटण्यास सांगेल.

अद्याप १४ व्या फेरीची तारीख नक्की झालेली नाही. मात्र, हे निश्चित आहे की भारत यावेळीही चीनला हॉट स्प्रिंगमधून (Hot Springs) मागे हटण्यास सांगेल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : भारताची सीमेवरील चिंता केवळ पाकिस्तानपुरती (Pakistan) मर्यादित नाही, तर पाकिस्तानचा मित्र चीनही (China) सीमेवर षडयंत्र रचण्यापासून थांबत नाही. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानप्रमाणेच चीनलाही झुकण्यास भाग पाडलं आहे. पूर्व लडाखमधील LAC वर भारताच्या कठोर भूमिकेमुळे चीन पुन्हा एकदा बातचीत करण्यासाठी तयार झाला आहे. भारत आणि चीनने चर्चेच्या 14 व्या फेरीसाठी सहमती दर्शविली आहे (India-China to Talk Border Again).

26 दहशतवाद्यांचं SHIFTING, काश्मीरवरून थेट आग्रा तुरुंगात रवानगी

अद्याप १४ व्या फेरीची तारीख नक्की झालेली नाही. मात्र, हे निश्चित आहे की भारत यावेळीही चीनला हॉट स्प्रिंगमधून (Hot Springs) मागे हटण्यास सांगेल. टीव्ही ९ हिंदींने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

चीनच्या षड्यंत्रांचे जाळे लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची तयारी केवळ वाढवली नाही, तर त्या तयारीची चाचपणीही भारत करत आहे. LAC म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल हजारो फूट उंच शिखरांमधील सर्वात दुर्गम भागातून जाते. हीच नियंत्रण रेषा ओलांडण्याचा चीन सतत प्रयत्न करत आहे. भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचा डाव चीन रचत राहतो. त्यामुळे भारतानं आता चीनच्या घुसखोरीच्या प्रत्येक प्रयत्नाला स़डेतोड उत्तर देण्याचा प्लॅन अधिक मजबूत केला आहे.

PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग?

लडाखमध्ये प्रत्येक आघाडीवर पराभव झाल्यानंतर चीन एलएसीच्या पूर्व भागात कट रचत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनला धडा शिकवण्यासाठी LAC जवळ भारतीय लष्कर अॅक्शनमध्ये आलं आहे. इथे पिनाका रॉकेट लॉन्चर आणि स्मर्च रॉकेट लॉन्चरचीही व्यवस्था केली गेली आहे, जे डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत अग्निवर्षा करून चीनचा डाव धुळीत मिसळू शकतं. भारतीय सैन्यानं या माध्यमातून चीनला संदेश दिला आहे, की कोणतंही षडयंत्र रचलं तर भारतही मागे पाहणार नाही आणि सडेतोड उत्तर देईल.

First published:

Tags: China, India china