मराठी बातम्या /बातम्या /देश /

कमालीच्या गुप्ततेत 26 दहशतवाद्यांचं SHIFTING, काश्मीरवरून थेट आग्रा तुरुंगात रवानगी

कमालीच्या गुप्ततेत 26 दहशतवाद्यांचं SHIFTING, काश्मीरवरून थेट आग्रा तुरुंगात रवानगी

 जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असणाऱ्या 26 दहशतवाद्यांचं (26 terrorist shifted to Agra jail from Jammu and Kashmir) उत्तर प्रदेशातील आग्रा तुरुंगात शिफ्टींग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असणाऱ्या 26 दहशतवाद्यांचं (26 terrorist shifted to Agra jail from Jammu and Kashmir) उत्तर प्रदेशातील आग्रा तुरुंगात शिफ्टींग करण्यात आल्याची माहिती  मिळत आहे. कमालीच्या गुप्ततेत ही कारवाई करण्यात आली असून हे सर्व दहशतवादी अत्यंत (Secret action by Indian government) खतरनाक असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये पकडलेल्या या सर्व दहशतवाद्यांना काश्मीरपासून दूरच्या तुरुंगात ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. असं केलं शिफ्टिंग जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असणाऱ्या 26 खतरनाक दहशतवाद्यांना विमानानं दिल्लीला आणण्यात आलं आणि तिथून त्यांची रवानगी आग्रा येथे करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिफ्टींग केलेल्या  दहशतवाद्यांमध्ये फारुक अहमद, शौकत अहमद, अब्दुल करीम, निसार अहमद खान, शाहजेब यसीन यासारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांवर हल्ला करणे आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. काश्मीरमध्ये वाढल्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दहशतवाद्यांना काश्मीरमध्येच ठेवण्याऐवजी इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैनिकांमध्ये होणाऱ्या चकमकीदेखील वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये बिहारी मजुरांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि परराज्यातून काश्मीरमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे वाचा- तुमच्यासाठी कायपण!'त्या'सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; 'सुख म्हणजे नक्की काय असतं शिफ्टिंगचं कारण गुलदस्त्यात दहशतवाद्यांचं शिफ्टिंग नेमकं का करण्यात आलं, याचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सरकारने याविषयी कुठलंही भाष्य केलेलं नसून दहशतवाद्यांच्या शिफ्टिंगच्या बातमीबाबतही मौन बाळगलं आहे. गेल्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमधून अतिरेक्यांना अटक होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Central government, Jammu kashmir, Terrorists, Uttar paredesh

  पुढील बातम्या