मराठी बातम्या /बातम्या /india-china /

गलवान चकमकीला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात चीनशी दोन हात करण्यास भारत हरप्रकारे सज्ज

गलवान चकमकीला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात चीनशी दोन हात करण्यास भारत हरप्रकारे सज्ज

भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या घटनेला आता एक वर्ष होत आहे. आता लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Manoj Narvane) यांनीही सांगितलं आहे, की भारत हर प्रकारच्या स्थितीसाठी तयार आहे.

भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या घटनेला आता एक वर्ष होत आहे. आता लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Manoj Narvane) यांनीही सांगितलं आहे, की भारत हर प्रकारच्या स्थितीसाठी तयार आहे.

भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या घटनेला आता एक वर्ष होत आहे. आता लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Manoj Narvane) यांनीही सांगितलं आहे, की भारत हर प्रकारच्या स्थितीसाठी तयार आहे.

नवी दिल्ली 15 जून: भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या घटनेला आता एक वर्ष होत आहे. एवढे महिने होऊनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control - LAC) सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही. दोन्ही बाजूंनी सैन्याची ताकद वाढवली जात आहे. पूर्व लडाखमध्ये चीन सातत्याने आपली क्षमता वाढवत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवानही सज्ज आहेत. भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Manoj Narvane) यांनीही सांगितलं आहे, की भारत हर प्रकारच्या स्थितीसाठी तयार आहे. आतापर्यंत दोन्ही देशांत 11 वेळा बातचीत झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय सुरक्षा दलांनी (Indian Security Forces) पूर्ण लडाख (Ladakh) क्षेत्रात स्वतःची स्थिती मजबूत केली आहे. पायाभूत सुविधांची उभारणी, संपर्क यंत्रणा वाढवणं आणि परकीय देशाच्या सैन्याचा सामना करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात करणं आदींचा त्यात समावेश आहे.

एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने सांगितलं, की लडाख सेक्टरमध्ये अचानक चीनचं (China) आक्रमण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्याने आपली क्षमता वाढवली आहे. सैन्याच्या सगळ्या चौक्यांपर्यंत रस्ते होणं, ही उपलब्धी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठी आहे.

कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

संपूर्ण LACच्या सोबत लडाखमध्ये चीनशी दोन हात करण्यासाठी अतिरिक्त स्ट्राइक कॉर्प्स (Strike Corps) तैनात करण्यात आले आहेत. मथुरेच्या वन स्ट्राइक कॉर्प्सना लडाखच्या उत्तर सीमेवर पाठवण्यात आलं आहे. 17 माउंटन स्ट्राइक कॉर्प्सला अतिरिक्त 10 हजार जवान देण्यात आले असून, त्यांच्याकडे ईशान्येकडच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय वायुसेनेनेही (Indian Air Force) आपल्या पातळीवर काम सुरू केलं आहे. राफेल विमानांसह मिग-29, सू-30 ही विमानंही उत्तरेकडच्या सीमाभागांत सक्रिय राहतील. चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत दुसरी स्क्वाड्रनही ऑपरेशनसाठी तयार असेल. चीन किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या अडचणीही काहीही करू शकत नाहीत, एवढ्या पातळीवरची तयारी केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Corona: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

भारतीय सैन्याने प्रथमच LACवर के-9 तोफा तैनात केल्या आहेत. या तोफांना चाकं असतात. त्यामुळे त्यांची वाहतूक करायला दुसरी वाहनं लागत नाहीत. M-777 आर्टिलरी गनही भारतीय सैन्याने तैनात केली आहे.

LACवर आकाश क्षेपणास्त्र, इस्रायलचं स्पायडर आणि रशियाचं पेचोरा आदी क्षेपणास्त्रं तैनात आहेत. त्याशिवाय सीमेवर रडार बस्टिंग, SPICE 2000, अँटी टँक गायडेड मिसाइल आर-73, 400 मीडियम रेंज एअर टू एअर गायडेड मिसाइल आदीही तैनात आहेत. तसंच, भारतीय सैन्याकडे 15-18 महिन्यांची रसद तयार आहे. एकंदरीत भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास पूर्णतः सज्ज आहे.

First published:

Tags: India china, Indian army