मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट  असल्याचं तपासणीत समोर आलं

हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट असल्याचं तपासणीत समोर आलं

हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट असल्याचं तपासणीत समोर आलं

हरिद्वार 15 जून: हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट आणि खोटे असल्याचं आता उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने (Uttarakhand health department) केलेल्या प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे. याबाबत 1,600 पानांचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. कुंभ मेळ्याच्या काळात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल 1 लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट (1 lakh Covid test results during Kumbh festival were fake) असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

यातीलच एक उदाहरण म्हणजे, एकच फोन नंबर तब्बल 50 लोकांच्या नावापुढे रजिस्टर करण्यात आला आहे. दुसरी बाब म्हणजे या सर्वांसाठी एकच अँटीजन कीट वापरलं गेलं असून ( याचा वापर केवळ एकदाच करता येतो) यातच 700 जणांची चाचणी केली गेली आहे. यात देण्यात आलेले पत्ते आणि नावंही पूर्णपणे काल्पनिक असल्याचं आढळलं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील घर क्रमांक 5 मधील एकाच घरातून 530 जणांचे सॅम्पल घेतल्याची यात नोंद आहे. एकाच घरात ५०० लोक राहाणं शक्य आहे का? असा प्रश्नही यानंतर उपस्थित झाला आहे. यात देण्यात आलेले इतर पत्तेही विचित्र आहेत. ज्यांचा कुंभ मेळ्याशी काहीही संबंध नाही.

राज्यातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट; पुण्यातील या भागात आज एकही नवा रुग्ण नाही!

अधिकाऱ्यानं याबाबत माहिती देत म्हटलं, की अनेक फोन नंबर फेक आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि 18 इतर लोकेशनवरील लोकांनी एकसारखेच नंबर शेअर केले आहेत. आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अहवाल हरिद्वाराच्या डीएमकडे पाठविण्यात आला आहे. यात बरीच अनियमितता सापडली आहेत. 15 दिवसात डीएमकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करू, असंही नेगी म्हणाले. हरिद्वारचे जिल्हादंडाधिकारी सी. रवीणकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करत असून पुढील सूचना येईपर्यंत सर्व एजन्सीचे प्रलंबित पेमेंट थांबविण्यात आले आहे.

एजन्सीने नियुक्त केलेले नमुने गोळा करणारे 200 जण हे राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा एंट्री ऑपरेटर असल्याचे समजले, जे हरिद्वारला कधीच आले नव्हते. नमुने गोळा करण्यासाठी नमुने घेणाऱ्याला शारीरिकरित्या त्याठिकाणी उपस्थित राहावे लागते. एजन्सीत नोंदवले गेलेल्या नमुने गोळा करणाऱ्यांशी संपर्क साधला असता असं आढळलं, की त्यातील 50 टक्के व्यक्ती राजस्थानमधील रहिवासी आहेत. यातील बरेच जण विद्यार्थी किंवा डेटा एंट्री ऑपरेटर होते, असा अधिकाऱ्यानं सांगितलं.

पॉझिटिव्हिटी रेट ठरवेल तुमचा जिल्हा अनलॉक होणार की नाही; काय असतो तो रेट?

यात नमुने घेण्यासाठी गेला असल्याची नोंद असलेल्या एकाकडे चौकशी केली असता, तो हनुमानगड (राजस्थान) येथील सरकारी अधिकृत केंद्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी असल्याचं समजलं. चौकशी केली असता त्याने सांगितले, की तो कुंभ येथे कधीच आला नव्हता. तो म्हणाला, की त्याच्या प्रशिक्षकाकडून हा डेटा देण्यात आला आहे. प्रशिक्षकानं त्याला हा आपल्या प्रशिक्षणाचा भाग असल्याचं सांगत ते अपलोड करण्यास सांगितले होते, असे तपास अहवालात म्हटले आहे.

Corona: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

आरोग्य विभागानं याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, की एजन्सी प्रत्येक अँटीजन टेस्टसाठी 350 रुपये देते तर RT-PCR टेस्टसाठी यापेक्षाही जास्त पैसे दिले जातात. त्यामुळे, या प्रकरणात करोडोंचा घोटाळा झाल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आलं, जेव्हा मागील आठवड्यात पंजाबमधील एका व्यक्तीला त्याच्या फोनवर हरिद्वार आरोग्य विभागाकडून कोविड निगेटिव्ह असल्याचा मेसेज आला. हा व्यक्ती कुंभ मेळ्यात आलाच नव्हता. यानंतर त्यानं याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं.

First published:

Tags: Corona virus in india, Kumbh mela