नवी दिल्ली, 22 जून : लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की, ‘आमच्या सीमेवर कुठलीही घुसखोरी झालेली नाही, ना कुठलीही घुसलेले आहे, ना आमची कोणतीही पोस्ट दुसर्याच्या ताब्यात आहे.’ चिनी माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचं कौतुक केलं आहे. आता चिनी माध्यमांमध्ये पंतप्रधान मोदींच्या विधानाचे कौतुक केल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारवर सवाल उपस्थित केला आहे.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की – चीनने आपल्या जवानांना मारलं..चीनने आपली जमीन हस्तगत केली..तर मग चीन या युद्धात पंतप्रधान मोदी यांचं कौतुक का करीत आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचं कौतुक चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झाले होते. हे वाचा- कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तिशाली तुकडी चीनला शिकवणार धडा भारताला हानी पोहोचविण्यासाठी चीनचा नवा कट; आता या आवश्यक वस्तू होणार महाग