मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारताला हानी पोहोचविण्यासाठी चीनचा नवा कट; आता या आवश्यक वस्तू होणार महाग

भारताला हानी पोहोचविण्यासाठी चीनचा नवा कट; आता या आवश्यक वस्तू होणार महाग

भारत-चीन सैन्यांमध्ये लडाख येथे झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अद्याप येथील तणाव सुरू आहे

भारत-चीन सैन्यांमध्ये लडाख येथे झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अद्याप येथील तणाव सुरू आहे

भारत-चीन सैन्यांमध्ये लडाख येथे झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अद्याप येथील तणाव सुरू आहे

नवी दिल्ली, 22 जून : भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.  भारतीय औषध कंपन्या (Pharmaceutical products) त्यांच्या गरजेच्या 70 टक्के एपीआय चीनकडून आयात करतात. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे, आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. सन 2019 मध्ये भारताने चीनकडून सुमारे 17,400 कोटी एपीआय केली आयात भारत दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, एपीआयसाठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताने चीनकडून सुमारे 17,400 कोटी (2.5 अब्ज डॉलर्स) एपीआय आयात केले होते. ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, कारण भारत जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्ममा, मायलन, झाइडस कॅडिला आणि पीफायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या एपीआयसाठी मुख्यतः चीनवर अवलंबून आहेत. चीनकडून दुहेरी हल्ला वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी ईटीला सांगितले की, गलवान खोऱ्यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे. एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा चुकीचा फायदा उठवू लागला आहे. एपीआयच्या किंमती वाढल्याने औषधांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. पॅरासिटामॉलची किंमत 27 टक्क्यांनी वाढली पॅरासिटामॉलची किंमत 27 टक्के, ciprofloxacin ची किंमत 20 टक्के, पेन्सिलीन जीची किंमत 20 टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रॉडक्टच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. हे वाचा- संपादन - मीनल गांगुर्डे    
First published:

Tags: India china border

पुढील बातम्या