कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तिशाली तुकडी चीनला शिकवणार धडा

कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तिशाली तुकडी चीनला शिकवणार धडा

या तुकडीबद्दल चिनी तज्ज्ञांनी वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, भारताइतकी मजबूत तुकडी अमेरिका किंवा रशिया या देशांकडेही नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले आहे. अद्यापही येथे तणावाचे वातावरण आहे. लडाखमध्ये भारताने वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्यास सतर्क केलं आहे. दरम्यान, भारताने 3488 किमी लांबीच्या एलएसीवर माउंटन फोर्स तैनात केले आहे. सैन्याची ही तुकडी डोंगरावरुन शत्रूवर नजर ठेवते. चिनी सैन्यास योग्य ते उत्तर देण्यासाठी त्यांना सीमेवर तैनात केल्याचे सांगितले जात आहे.

माउंटन फोर्सची ताकद

सीमेवर तैनात माउंटन फोर्स गोरिला युद्धात तरबेज असतात. कठीण परिस्थितीत शत्रूंना धडे शिकविण्यात त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. त्यांना डोंगरावर लढण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी माउंटन फोर्सने पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिल होतं. स्वत: चिनी तज्ज्ञांनी अलीकडेच म्हटले होते की इतकी मजबूत माऊंटन फोर्स अमेरिका किंवा रशियाकडेही नाही.

अचूक निशाणा साधण्यात तरबेज

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना माजी सैन्य प्रमुख म्हणाले की, माउंटन फोर्सचा निशाणा अचूक असतो. या दलात उत्तराखंड, लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सैनिकांचा समावेश आहे. चीनच्या प्रदेश थोडा सपाट आहे, परंतु भारताच्या सीमेवर डोंगराची अतिशय कठीण शिखरे आहेत. अशा परिस्थितीत सैन्याला पुढे जाणे सोपे नाही. परंतु माउंटन फोर्स हे अगदी आरामात ही परिस्थिती नियंत्रित करू शकतात.

हे वाचा-चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटींच्या करारावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: June 22, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading