मराठी बातम्या /बातम्या /india-china /'हॉट स्प्रिंग, डेपसांग आणि गोगरामधून सैन्य माघारी घ्या'; 9 तास भारत-चीनमध्ये या मुद्द्यांवर चर्चा

'हॉट स्प्रिंग, डेपसांग आणि गोगरामधून सैन्य माघारी घ्या'; 9 तास भारत-चीनमध्ये या मुद्द्यांवर चर्चा

चीनचे सैन्य अजूनही हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागात उभे आहेत. बैठकीत भारताकडून या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यावर भर दिला जात आहे

चीनचे सैन्य अजूनही हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागात उभे आहेत. बैठकीत भारताकडून या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यावर भर दिला जात आहे

चीनचे सैन्य अजूनही हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागात उभे आहेत. बैठकीत भारताकडून या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यावर भर दिला जात आहे

नवी दिल्ली 01 ऑगस्ट : भारताने चीनला हॉट स्प्रिंग, डेपसांग आणि गोगरा भागात तैनात सैन्य ताबडतोब मागे घेण्यास आणि मे 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करण्यास सांगितलं आहे. दोन्ही देशांदरम्यान शनिवारी सकाळी झालेल्या शीर्ष लष्करी कमांडर्सच्या 12 व्या बैठकीत ही बाब भारताने मांडली (India and China Held 12th Round of Talks) आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की, दोन्ही देशांमधील वेळापत्रकानुसार मोल्दोमध्ये सकाळी 10.30 वाजता बैठक सुरू झाली, जी संध्याकाळी 7:30 वाजता संपली. सोमवारी या संदर्भात संयुक्त निवेदन जारी केलं जाऊ शकतं, असे सूत्रांनी सांगितलं. बैठकीत भारताचे नेतृत्व 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करत आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी आहेत.

मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश

फेब्रुवारीमध्ये पॅनगॉन्ग आणि इतर भागातून दोन्ही देशांचे (Military Standoff Between India and China) सैन्य माघारी गेले असले तरी एलएसीच्या बाजूने अनेक ठिकाणी अजूनही वाद आहे. चीनचे सैन्य अजूनही हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागात उभे आहेत. बैठकीत भारताकडून या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यावर भर दिला जात आहे. पॅनगॉन्गमध्येही मे 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी भारताकडून वारंवार विचारण्यात आलं आहे. सैन्याने माघार घेतली असली तरी तिथे गस्त अजूनही बंद आहे. या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी सुमारे चार महिन्यांच्या अंतरानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू

भारताकडून दर महिन्याला किमान एक बैठक घेण्याचे प्रयत्न केले जात होते, परंतु चीनच्या बाजूने विलंब होत होता. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अलीकडेच त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर दोन आठवड्यांनी ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, असं मानलं जात आहे, की यात विवादांचे सकारात्मक निराकरण होऊ शकते. 14 जुलै रोजी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत सुमारे एक तास बैठक घेतली होती.

First published:

Tags: Army, China, India china