Home /News /national /

मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश; कडक निर्बंध घालणार

मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश; कडक निर्बंध घालणार

46 जिल्ह्यांचा Positivity Rate 10 पेक्षा जास्त आहे. सद्यस्थितीत ढिसाळपणा केल्यास या जिल्ह्यांतली परिस्थिती आणखी ढासळत जाईल, असा इशाराही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) दिला आहे.

नवी दिल्ली, 31 जुलै : देशातल्या कोरोनाबाधितांच्या (Corona Patients) रुग्णवाढीचा वेग गेले काही दिवस मंदावलेला असताना किमान 10 राज्यांत रुग्णवाढ पुन्हा झपाट्याने होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही आठवड्यांत 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालावेत, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. देशातल्या 46 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 10 टक्क्यांपेक्षा जास्त असून, 53 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविड-19 बाधितांचं निदान लवकरात लवकर होण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचं आवाहन केलं आहे. वाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर? सद्यस्थितीत ढिसाळपणा केल्यास या जिल्ह्यांतली परिस्थिती आणखी ढासळत जाईल, असा इशाराही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांतल्या परिस्थितीचा कोविड-19चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (31 जुलै) बैठक आयोजित करण्यात आली होती. या राज्यांतल्या आरोग्य विभागाकडून कोविड-19चं (Covid19) सर्वेक्षण आणि व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. या राज्यांमध्ये दररोज एक तर रुग्णसंख्या तरी वाढते आहे किंवा पॉझिटिव्हिटी दरही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही आठवड्यांत 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांनी नागरिकांच्या गर्दीवर, प्रवासावर निर्बंध आणावेत, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही, असं आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. या राज्यांतले 80 टक्क्यांहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients) होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) आहेत. त्या लोकांचा इतरांशी संपर्क येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. होम आयसोलेशनमधल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवायला हवं, तसंच ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज असेल, त्यांना तातडीने हॉस्पिटलाइझ करायला हवं, असंही केंद्राने म्हटलं आहे. कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका? 10 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं (Vaccination) प्रमाण वाढवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. खासगी हॉस्पिटलनीही पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे निर्देश राज्यांनी द्यावेत आणि त्यांना त्यासाठी सहकार्य करावं, असंही केंद्राने म्हटलं आहे. राज्यांनी स्वतःच्या पातळीवरही सेरो सर्वेक्षणं (Sero Surveys) करावीत, असं आवाहनही करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिला आहे. कारण एकूण मृतांमध्ये या वयोगटातल्या मृतांची संख्या 80 टक्के आहे. अनावश्यक प्रवास, गर्दी यांवर बंधनं आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या