Home /News /national /

भगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू, सुरू होती नाटकाची तालीम

भगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू, सुरू होती नाटकाची तालीम

वीर शहीद भगत सिंह (Bhagat Singh) यांच्या जीवनावर अधारित नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना (rehearsing the play) एका चिमुकल्याचा फास लागून मृत्यू (Death by Strangulation) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    बदायू, 31 जुलै: वीर शहीद भगत सिंह (Bhagat Singh) यांच्या जीवनावर अधारित नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना (rehearsing the play) एका चिमुकल्याचा फास लागून मृत्यू (Death by Strangulation) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही मुलं 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भगत सिंह यांच्यावरील नाटक सादर करता यावं, यासाठी तयारी करत होते. भगत सिंहाना देण्यात आलेल्या फाशीच्या घटनेची रंगीत तालीम सुरू असताना एका नऊ वर्षीय चिमुकल्याला खरोखर फास बसला. यावेळी याठिकाणी अन्य मुलं देखील होती. पण त्याची मदत कोणी करू शकलं नाही. यातचं संबंधित मुलाचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 9 वर्षीय मुलाचं नाव शिवम असून तो उत्तर प्रदेशातील बदायू येथील रहिवासी आहे. मयत शिवमच्या शाळेत 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवम आणि त्याच्या काही मित्रांनी वीर शहिद भगत सिंह यांच्या जीवनावर अधारित नाटक करण्याच ठरवलं होतं. तर शिवम हा भगत सिंहाची भूमिका पार पाडणार होता. हेही वाचा-हृदयद्रावक! प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमी युगुलानं उचललं टोकाचं पाऊल दरम्यान या नाटकाचा सराव सुरू असताना, शिवमला खरोखर फास लागला आहे. यातचं त्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. भगत सिंहाना फाशी दिलेल्या घटनेची रंगीत तालीम करण्यासाठी शिवम स्टूलवर चढला होता. यावेळी गळ्याभोवती दोरी अडकल्यानंतर, अचानक त्याच्या पायाखालील स्टूल सरकला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट झाला. दरम्यान, शिवमच्या शाळेतील काही मुल याठिकाणी होती. पण ते काहीच मदत करू शकली नाहीत. यातच शिवमचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा-मित्रांना वैतागून उचललं धक्कादायक पाऊल; हायवेशेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुण दुसरीकडे, मृत शिवमच्या कुटुंबीयांनी संबंधित घटना अपघातानं घडली असल्याचं सांगत कोणाविरोधातही तक्रार दाखल केली नाही. शिवाय पोलिसांनी घटनेबाबत काहीही न कळवता परस्पर अंत्यसंस्कार उरकले आहेत. अशा पद्धतीनं शिवमचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Uttar pardesh

    पुढील बातम्या